वणीमध्ये महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाची धामधूम

दिगंबर पाटेळे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

वणी (नाशिक) : येथील केआरटी कला व वाणिज्य महाविद्यालयात सध्या सांस्कृतिक महोत्सवाची धामधूम सुरु असून 'ट्रेडीशनल डे' निमित्त महाविद्यालयीन युवक-युवतींनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारत विविधेतून एकतेचे दर्शन घडविले. वणी महाविद्यालयात 25 जानेवारीपासून सांस्कृतिक महोत्सव सुरु असून दररोज वेगवेगळ्या प्रकारचे कला, क्रिडा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

25 जानेवारीला स्टॉल डे व ब्लॅक अॅन्ड व्हाईट डे, २७ला साडी व टाय डे, २८ला व 29ला 'ट्रेडीशनल डे' चे आयोजन करण्यात आले होते. आज महाविद्यालयातील साठ ते सत्तर टक्के युवक युवती वेगवेगळ्या वेशभूषेत महाविद्यालयात प्रगट झाली होती. यात युवतींनी पांरपारीक मराठ मोळी नऊवारी साडी नेसून नाकात नथ, कंबर पट्टा, गळ्यात वेगवेगळे अलंकार परीधान करुन काहींनी डोक्यास आकर्षक फेटे बांधून व नटून थटून महाविद्यालयात दाखल झाल्या होत्या. यात काही युवतींनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कोणी रमाईची तर कोणी नवरदेव - नवरीची वेशभूषा साकारलेल्या होत्या. 

काही युवती आदिवासी वेशभूषेत तर काही जिन्स हॅट घालून आल्या होत्या. यात युवकवर्गही मागे न राहाता काही शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तर काहींनी आदिवासी क्रांतीकारकांची वेशभूषा साकारली होती. काहींना वारकरी, पुढारी, ऑफिसर, मुस्लिम बांधवाची तर कोणी मद्रासी अण्णाची वेशभूषा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महाविद्यालयात जाताना येताना रस्त्यावर वेगवेगळ्या वेशभूषेतील युवक युवती दिसत असल्याने गावातील रस्त्यांनाही सांस्कृतिक महोत्सवाचे रुप आले होते. दरम्यान बुधवारी (ता. 31) शेला पागोटे बरोबरच चित्रपट दिग्दर्शक व लेखक शाम लोंढे यांच्या हस्ते महाविद्यालयत पारितोषिक वितरण तथा वार्षिक गुणगौरव समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. बच्छाव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप गोसावी यांनी दिली आहे.

Web Title: Marathi news wani news cultural festival