अंगणात, रस्त्यावर सडा मारल्यास तोडणार नळकनेक्‍शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

नाशिकः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी हवामान विभागाने पाऊस लांबण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाने महापालिकेकडे पाण्याचा अहवाल मागितल्याने त्या पार्श्‍वभूमीवर जाग्या झालेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने अखेरीस नळकनेक्‍शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला गंगापूर व दारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातपूर विभागात अधिक पाणीपुरवठा करावा लागत असल्याने महापालिकेने मुकणे धरणातील आरक्षित तीनशे दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास सुरवात केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news waste of water