पाणी कपातीची उद्यापासून अंमलबजावणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होईपर्यंत शहरात एकवेळ पाणी कपात लागु करण्याचा निर्णय शुक्रवारी महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाच्या अहवालावरून घेतला होता. त्याची अंमलबजावणी रविवार पासून सुरु होणार असल्याने एकीकडे शहरात पाऊस कोसळतं असला तरी दुसरीकडे नळांना फक्त एकवेळ पाणी येणार आहे. दारणा धरणातून पाणी उपसा बंद केल्याने त्याचा परिणाम गंगापूर धरणातून अधिक पाणी उपसावर झाला.

गंगापूर धरणातील इन्टेक वेलच्या न्युनतम पातळीपर्यंत पाणी पोहोचल्याने कपात करणे गरजेचे आहे. सध्या त्र्यंबकेश्‍वर व गंगापूर धरणाच्या लाक्ष क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतं आहे परंतू सध्या पाऊस समाधानकारक असला तरी पावसाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाईचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो त्यामुळे कपात करण्याची प्रशासनाची भुमिका होती. महापौर भानसी यांना अहवाल सादर करण्यात आल्यानंतर कपातीचा निर्णय घेण्यात आला. नवीन नियोजनानुसार जेथे दोन वेळा पाणी पुरवठा होतो तेथे एकवेळ पुरवठा आज पासून होणार आहे. पुढील चार दिवसात समाधानकारक पाऊस न पडल्यास आठ दिवसातून एकदा संपुर्ण एक दिवस पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तो दिवस गुरुवारचा निश्‍चित करण्यात आला आहे. दररोज 60 दशलक्ष लिटर्स पाणी वाचविण्याचे नियोजन आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water shortage