esakal | सापळा रचला आणि रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्याला पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

सापळा रचला आणि रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्याला पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार ः महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना लागणारे रेमडिसिव्हिर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात लागत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून शहादा येथे रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करताना एकास पोलिसांनी अटक केली. तो शतायू हॉस्पिटल परिसरात फिरत असताना पोलिसांचा जाळ्यात अडकला.

हेही वाचा: कोरोनाचा विळखा ः धुळे जिल्ह्याला गरज ३२ टन ऑक्सिजनची

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना एकजण दुचाकीवरून (एमएच ३९, एल ३७१६) शहादा शहरात शतायू हॉस्पिटलजवळ रेमडेसिव्हिर इंजेक्शन अधिक किमतीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची महिती मिळाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजपूत यांनी पथकास शहादा येथे सज्ज केले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसांत अडीचशे जणांचा मृत्यू

हाॅस्पीटल समोर रचला सापळा

पथकाने स्वामी समर्थ मंदिरासमोरील शतायू हॉस्पिटलसमोर सापळा रचला. काही वेळात बायपास रोडच्या दिशेने एक दुचाकीस्वार शतायू हॉस्पिटलजवळ आला. त्यास पथकाने थांबवून विचारले असता, त्याने रतिलाल देवराम पवार (वय ३०, रा. सावखेडा, ता. शहादा) असे नाव सांगितले. त्याच्या दुचाकीच्या क्रमांकाची खात्री केली असता, माहिती मिळालेली दुचाकी तिच असल्याने त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली व त्याच्या ताब्यात असलेले रेमडेसिव्हिरबाबत विचारपूस केली. एका व्यक्तीला १२ हजार रुपयांत विकणार असल्याची कबुली त्याने दिली. कुठल्या रुग्णाच्या नातेवाइकास विकणार होता. तसेच इंजेक्शन कोठून आणले, याबाबत विचारपूस करता, त्याने त्याबाबत उपयुक्त माहिती दिली नाही. त्याच्या ताब्यातून एक इंजेकशन, दहा हजारांचा मोबाईल, ३० हजारांची दुचाकी व २०० रुपये रोख, असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे