esakal | सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध, कोरोना व्हायरस व भारतीय रुपयाची होणारी घसरण याचा एकत्रित परिणाम म्हणून सोने, चांदी बाजार दिवसागणिक तेजीत येत आहे. गेल्या 72 तासांत सोन्याच्या भावात (प्रतितोळा) 1700; तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झाली. 
गेल्या बुधवारी (19 फेब्रुवारी) सोन्याचा भाव (प्रतितोळा) 41 हजार 300 रुपये होता, आज तो 43 हजारांवर गेला. चांदीचा भाव कालपर्यंत प्रतिकिलो 48 हजार रुपये होता. आज तो 49 हजारांवर पोहोचला. सध्या लग्नसराई सुरू असून, त्यात झालेली भाववाढ वधूपक्षाकडील मंडळींना आर्थिक संकटात टाकणारी आहे. त्यामुळे केव्हा एकदाचे अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध थांबते, याकडे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही दिवसांतील भाव असे 
सोने (प्रतितोळा)- चांदी (प्रतिकिलो) 
19 फेब्रुवारी--41300--47000 
20 फेब्रुवारी--41300--47000 
21 फेब्रुवारी--41300--47000 
22 फेब्रुवारी--43000--48000 
23 फेब्रुवारी--43000--49000 
 
अमेरिका व इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात सतत वाढ होत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचा भाव 39 हजार रुपये होता. आज तो 43 हजारांवर पोहोचला. 
- मनोहर पाटील, व्यवस्थापक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव