Market Committee Election : शहाद्यात सर्कलनिहाय 5 मतदान केंद्रे, 12 बूथ

 market committee election
market committee electionesakal

Nandurbar News : शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्णत्वास आली आहे.

१५१ गावांसाठी सर्कल निहाय एकूण पाच मतदान केंद्रे व १२ बूथ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीरज चौधरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम बागल यांनी दिली. (Market Committee Election in Shahada circle wise 5 polling stations and 12 booths nandurbar news)

शहादा शहर व ग्रामीण भागात प्रकाशा, वडाळी, मंदाना, म्हसावद ही पाच मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला परिसरातील गावे मतदानासाठी जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे मतदाराला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रे जाहीर केलेली आहेत. १८ जागांसाठी एकूण चार विभाग उमेदवारांसाठी आहेत. त्यात सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदारसंघ व हमाल मापारी मतदारसंघ यांचा समावेश आहे.

सोसायटी संस्था मतदार संघात एकूण ८४ सोसायटींची संख्या आहे. तर ९८६ मतदार आहेत. तालुक्यात ग्रामपंचायती १५१ आहेत तर मतदार १३९० आहेत. व्यापारी २५० तर हमाल मापारी २११ आहेत. एकूण २८४७ मतदार आहेत. बाजार समितीसाठी २८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

 market committee election
NMC Abhay Yojana : नळजोडणी अधिकृत न झाल्यास तिप्पट दंड; महापालिकेची 45 दिवसांची अभय योजना

निवडणूक रिंगणातील उमेदवार असे :

सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण) : २४

सहकारी संस्था मतदार संघ (महिला राखीव) : ७

सहकारी संस्था मतदार संघ(इतर मागासवर्गीय) : ३

सहकारी संस्था मतदार (भ. जाती जमाती/वि. जा.) : ३

ग्रामपंचायत मतदार संघ (सर्वसाधारण) : १०

ग्रामपंचायत मतदार संघ ( अनुसूचित जाती जमाती) : ४

ग्रामपंचायत मतदार संघ( आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) : ३

व्यापारी व आडत्यांचा मतदारसंघ : ६

हमाल व तोलारी मतदारसंघ : ४

एकूण : ६५

 market committee election
Dhule Water Shortage : सोनगीरला पाणीटंचाई..! महिन्यात फक्त तीनदा नळांना पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com