विवाहाची नोंदणी केलीय ना?...कारण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

अनेकांकडून विवाह नोंदणीचे गांभीर्य घेतले जात नाही. आवश्‍यकता भासते त्यावेळी मात्र धावपळ केली जाते. सद्या होणाऱ्या विवाह नोंदणीमध्ये नवीन जोड्यांचे सार्वधिक प्रमाण आहे. जुन्या जोडप्यांकडून आता संसार झाला. नोंदणीची काय आवश्‍यकता असा समज करत नोंदणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम नोंदणीवर झाला असून नोंदणीत चांगलीच घट झाली. 

 

नाशिकः पूर्व विभागात सन 2018 च्या तुलनेत सन 2019 मध्ये विवाह नोंदणीचे प्रमाण घटले आहे. जुन्या लोकांनी अर्थात काही वर्षापूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांनी नोंदणीकडे पाठ फिरविल्याने नोंदणीवर परिणाम झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. विवाह नोंदणी प्रमाण पत्राचे सद्या महत्व वाढले आहे. मुलांच्या शाळेत प्रवेश प्रक्रीयापासून ते पारपत्र काढण्यापर्यंतच्या सर्वच कामांमध्ये विवाह नोंदणीचे प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. असे असताना सन 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 165 ने नोंदणीत घट झाली.

2019 मध्ये केवळ 382 नोंदणी...

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 वर्षात 547 विवाह नोंदणी झाली होती. त्यात 72 मुस्लिम जोडप्यांचा समावेश होता. तर 2019 मध्ये केवळ 382 नोंदणी झाल्यात त्यात 43 मुस्लिम जोड्यांचा समावेश आहे. यातही जास्तीत जास्त नव्याने विवाह झालेल्यांचे नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. 

 
जुन्या जोडप्यांची नोंदणीकडे पाठ 
प्रत्येक विवाहीत कुटूंबीयानी विवाह नोंदणी करणे आवश्‍यक आहे. तरी देखील अनेकांकडून विवाह नोंदणीचे गांभीर्य घेतले जात नाही. आवश्‍यकता भासते त्यावेळी मात्र धावपळ केली जाते. सद्या होणाऱ्या विवाह नोंदणीमध्ये नवीन जोड्यांचे सार्वधिक प्रमाण आहे. जुन्या जोडप्यांकडून आता संसार झाला. नोंदणीची काय आवश्‍यकता असा समज करत नोंदणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम नोंदणीवर झाला असून नोंदणीत चांगलीच घट झाली. 

 हेही वाचा > स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विवाह नोंदणीची भासणार आवश्‍यकता ? 
शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त होत असताना कर्मचारी शासकीय कागदपत्रावर त्यांचे वारसासाठी बहुदा पत्नीचे नाव दिले जाते. अशा वेळेस पत्नीचे नाव लावतांना कुठली अडचण येवू नये. यासाठी येणाऱ्या दिवसात विवाह नोंदणी प्रमाणपत्र सेवानिवृत्तीच्या वेळी अनिवार्य केले जाणार असल्याची माहिती यावेळी समोर आली. त्यामुळे भविष्यात विवाह नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता विभागाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केली. 
काही दिवसात सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून विवाह नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 
 

हेही वाचा >स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage registration declined nashik news