नंदुरबार जिल्ह्यातून गेलेले "ते' सात विद्यार्थी पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

क्कलकुवा येथे शिक्षणासाठी आलेल्या बिहारमधील अडीच हजारांवर विद्यार्थ्यांना विशेष रेल्वेने पाच मेस सहरसा येथे पाठविण्यात आले. तत्पूर्वी, या विद्यार्थ्यांची संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली होती.

नंदुरबार ः अक्कलकुवा व शहादा येथून बिहारमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी सात जण "कोरोना पॉझिटिव्ह' निघाल्याचे तेथील सहरसा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी "नंदुरबार रिटर्न' असल्याचे त्या जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य गंभीर असून, त्याबाबत नंदुरबारच्या जिल्हा प्रशासनाने मात्र अधिकृतरीत्या अजून काहीही जाहीर न केल्याने लोकांच्या मनातील गुंता वाढला आहे. इथून सर्व वैद्यकीय तपासणी करून गेलेले हे विद्यार्थी दोनच दिवसांत "कोरोना पॉझिटिव्ह' कसे निघाले, असा प्रश्‍न आपल्याकडे झालेल्या वैद्यकीय तपासणीबाबत शंका निर्माण करणारा आहे. 

क्कलकुवा येथे शिक्षणासाठी आलेल्या बिहारमधील अडीच हजारांवर विद्यार्थ्यांना विशेष रेल्वेने पाच मेस सहरसा येथे पाठविण्यात आले. तत्पूर्वी, या विद्यार्थ्यांची संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाविषयीची लक्षणे आढळून आलेली नसल्याने त्यांना पाठविण्यात आले. अक्कलकुवा व शहादा येथून त्यांना वाहनांनी नंदुरबार रेल्वेस्थानकात आणण्यात आले. तेथे त्यांना "फिजिकल डिस्टन्स' पाळत रेल्वेत बसविण्यात आले. रेल्वे प्रशासनाने विद्यार्थी येण्यापूर्वी सर्व परिसर सॅनिटाइझ केला होता. लोकप्रतिनिधी व प्रशासनातर्फे या विद्यार्थ्यांची पुरेशी काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी सहरसा येथे त्यांची पुन्हा तपासणी व "स्वॅब' नमुने घेण्यात आले. त्यात पहिल्या दिवशी तीन व नंतर चार, असे सात विद्यार्थी "पॉझिटिव्ह' निघाले. याबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नंदुरबारचे नाव घेत माहिती दिली. राष्ट्रीय वृत्तवाहिनींवरून नंदुरबारचे नाव दाखविण्यात आले. 

दरम्यान, येथील प्रशासनाने मात्र अजून त्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे तर्कवितर्क केले जात आहेत. प्रशासनाने केवळ अक्कलकुवा येथील संस्थेला विद्यार्थ्यांची नावे तपासायला सांगितली होती. मात्र, त्यानंतरही त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एकूणच नंदुरबारचे नाव घेतले जात असताना प्रशासनाने स्पष्ट माहिती न दिल्याने वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news nandurbar "They" seven students from Nandurbar district are positive