Dhule Milk Adulteration : दूध भेसळीमुळे 6 विक्रेत्यांवर कारवाई; जिल्हा समन्वय समितीकडून धडक तपासणी

Milk inspection machine and Vendors pouring adulterated milk after inspection by District Committee in Sakri Road area
Milk inspection machine and Vendors pouring adulterated milk after inspection by District Committee in Sakri Road area esakal

Dhule Milk Adulteration : जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या संयुक्त पथकाने दुधात भेसळ आढळलेल्या सहा दूध विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे दूध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. (Milk Adulteration Collision investigation on Sakri Road by District Coordination Committee dhule news)

समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, वैधमापनशास्त्रचे सहाय्यक नियंत्रक आर. सी. पाटील, सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, विस्तार संकलन प्रीतेश गोंधळी, पोलिस नाईक अतुल बागूल, अतुल पिंगळकर तसेच वसुधारा डेअरीतील दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांच्या पथकाने ही तपासणी केली.

पाण्याची भेसळ आढळली

पथकाने शहरातील साक्री रोड, साक्री नाका परिसरात दूध वाहतूक, पुरवठादार, फेरीवाले आदींकडील दुधाची लैक्टोस्कॅन या स्वयंचलित उपकरणाद्वारे धडक तपासणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Milk inspection machine and Vendors pouring adulterated milk after inspection by District Committee in Sakri Road area
Dhule Fake Fertilizer Case : ग्रीनफील्ड कंपनीचा परवाना निलंबित; बनावट खत प्रकरणी कृषी संचालकांची कारवाई

यात शासनाने निर्धारित केलेल्या निकषाप्रमाणे निर्धारित गुणप्रत गायीच्या दुधासाठी ३.५/८.५ आणि म्हशीच्या दुधासाठी ६.०/ ९.० याप्रमाणे फॅट व एसएनएफची तुलनात्मक पडताळणी करण्यात आली. या कारवाईस्थळी एकूण ११ दूध विक्रेत्यांकडील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. पैकी एकूण सहा दूध विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ त्या-त्या प्रमाणात आढळली.

१६० लिटर दूध नष्ट

भेसळीतील सरासरी १६० लिटर दूध लागलीच नष्ट करण्यात आले. तसेच वैध मापनशास्त्र विभागासोबत संयुक्त पथकाद्वारे बजरंग डेअरीची (साक्री रोड) तपासणी झाली. त्यात दूध मोजण्याच्या मापांची पडताळणी करण्यात आली असता या डेअरीतील मापे अवैध स्वरूपाची आढळली.

त्यामुळे तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भेसळ करणे हा गुन्हा असून, यापुढील काळात अशा दूध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी दिला.

Milk inspection machine and Vendors pouring adulterated milk after inspection by District Committee in Sakri Road area
Dhule Crime News : पेडकाईदेवी मंदिराच्या आवारात चोरीचा प्रयत्न; गुप्तधन काढण्याचा संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com