जळगाव- सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या कार्यकाळातील काही कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार व त्यांनी परवानगी न घेता केलेल्या विदेश दौऱ्यासंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री शिवेंद्रराज भोसले यांनी विधिमंडळात दिली.