जळगाव- शहरालगत औद्योगिक वसाहतीत कृषीसह अन्य घटकांसंबंधित आणि त्यावर अवलंबून अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. शासन स्तरावरून दरवर्षी विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र त्यासाठी आवश्यक रस्ते, वीज, पाणी आणि कामगार वसाहतींसह अनेक मूलभूत सुविधांची वानवा असून, किमान या सुविधा तातडीने पुरवाव्यात, अशी मागणी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.