एरंडोल- सत्संग सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला होऊन महिलांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने १५ ते २० युवकांनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला करून मारहाण केली. त्यात चार जण जखमी झाले. ही घटना काल (ता.११) रात्री नऊच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे घडली.