Sakal Impact : शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन; आमदार पावरांचे निवेदन

News released on March 17.
News released on March 17. esakal

शिरपूर (जि. धुळे ) : नैसर्गिक आपत्तीनंतर खरीप व रब्बी पिकांचा विमा शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात विमा कंपनीने चालवलेल्या अनागोंदीबाबत ‘सकाळ’मधून १७ मार्चला प्रकाशित झालेल्या वृत्ताची आमदार काशीराम पावरा (Kashiram Pawara) यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. (MLA Kashiram Pawara took serious note of news published in Sakal on March 17 regarding chaos run by insurance company dhule news)

विमा कंपनीसह महसूल व कृषी खाते यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक वसीम शेख, जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. शेतकऱ्‍यांना न्याय न मिळाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा आमदार पावरा यांनी दिला.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम ९४२ शेतकऱ्यांच्या खात्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये टाकण्यात आली होती. त्यात १५ शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजारापेक्षाही कमी रक्कम दिल्याचे आढळले. त्यामुळे अशा दाव्यांमध्ये कोणत्या पद्धतीने तडजोड झाली, किंवा ते निकाली कसे काढले याबाबत विचारणा केली असता संबंधित विमा कंपनीचे तालुका व जिल्हा प्रतिनिधी उत्तर देऊ शकले नाहीत.

त्यातच तब्बल वर्षभरापासून खरीप विमा कार्यालय बंद असल्याचे आढळले. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्याबाबत सुरु असलेल्या हलगर्जीपणाचे वृत्त सकाळमधून प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर आमदार पावरा यांनी कृषीमंत्री, संबंधितांना पत्र देऊन विविध प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

News released on March 17.
Agriculture News: खामखेड्यात पांढऱ्या टरबुजाचे यशस्वी उत्पादन; 75 दिवसात दीड लाखाचा फायदा

९४२ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी १५ शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे प्रमाण कसे ठरविले हा संशयास्पद मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न कोणत्या आधारावर ठरविले, विमा देयक ठरविताना पीक नुकसानीचा जोखीमस्तर कशा प्रकारे ठरविण्यात आला, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पंचनाम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम एक जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना का दिली नाही, नुकसान भरपाईचे सूत्र विमा भरताना शेतकऱ्यांना सांगण्यात आले किंवा नाही, उंबरठा उत्पन्न, तांत्रिक उत्पादन, जोखीमस्तर याची माहिती दिली किंवा नाही, या प्रश्नांबाबत स्पष्टीकरण न मिळाल्यास जनआंदोलनासह कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा आमदार पावरा यांनी दिला.

रब्बीचे त्रांगडे

रब्बी पीक विम्याबाबत तालुक्यातून एकूण एक हजार ६७४ तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झाल्या. मात्र कोणताही पंचनामा न करताच केवळ १०३ तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. चार ते सात मार्चदरम्यान सर्वत्र अवकाळी पाऊस असूनही विमा कंपनीने बेजबाबदारपणा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तक्रारी दाखल करून विमा कंपनीला नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगून शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी मदत करावी, असेही आमदार पावरा यांनी सांगितले.

News released on March 17.
Market Committee Election : बिनविरोधची परंपरा टिकणार की खंडित होणार? पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com