जळगाव- शहरासह जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने सुमारे शंभर ठिकाणी वीज खांब कोसळले. ट्रान्सफॉर्मरचे डीपी कोसळणे, अनेक ठिकाणी विजांचा तारा तुटल्या, विविध कंपन्याच्या ‘वायफाय’च्या वायरही तुटल्या आहेत. .वीजखांब कोसळल्याने १२ ते १५ तास वीजपुरवठा खंडीत झाला आहे. शहरातील काही भागांत २४ ते ३० तासांपासून वीजपुरवठा खंडीत असून, बुधवारी रात्रीपर्यंत सुरळीत होऊ शकला नव्हता. विविध ठिकाणी हायड्रोक्रेनच्या मदतीने वीजतारांवरील झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे..वादळाने मोठे नुकसानजळगाव शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी दुपारी तासभर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने शहरातील होर्डिंग्ज तुटून पडले, खांब कोसळले व झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्या. त्यामुळे मंगळवारी दुपारी तीनपासूनच शहरातील बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडीत झाला होता. मध्यरात्रीपर्यंत तो सुरू होऊ शकला नाही. बुधवारी पहाटे काही तासांसाठी वीजपुरवठा सुरू झाला. नंतर पुन्हा खंडीत झाला..मार्केट परिसर अंधारातजळगाव शहरातील वर्दळ असलेल्या गोलाणी व्यापारी संकुल, फुले मार्केटचा परिसर मंगळवारपासून अंधारात आहे. या बाजारपेठेतील प्रमुख भागांत तब्बल ३० तासांपासून वीज नाही. दुकानांमध्ये अंधार आहे. ज्या दुकान, कार्यालयांमध्ये इन्वहर्टर आहेत, त्यांचा बॅकअपही संपला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्केट परिसर दोन दिवसांपासून अंधारात आहे. बुधवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता..काही ठिकाणी होर्डिंग्सचे कापड लाईनवर अडकून बिघाड झाला आहे, तसेच तारा तुटलेल्या परत जोडून वीजवाहिनी पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व विद्युत यंत्रणेवर काम करणाऱ्या एजन्सी यांच्या माध्यमातून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महावितरणकडून करण्यात येत आहे. ही बाब नैसर्गिक आपत्ती असल्याने विद्युत यंत्रणा अनपेक्षित क्षतीग्रस्त झालेले असल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आहे..पाणीपुरवठा यंत्रणा ठप्पवीजपुरवठा खंडीत झाल्याने जळगावसह भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. भुसावळ शहरातील जलशुद्धीकरण केंद्र व रॉ वॉटर पपींग हाऊसचा या एक्स्प्रेस फिडरचाही वीजपुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री उशिरापर्यंतही कार्यरत न झाल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे शहरातील रोटेशनवरही परिणाम झाला. अनेक भागांत मंगळवारी पाणीपुरवठा होणार होता, त्यावर परिणाम झाला आहे..वादळी पावसाने अनेक ठिकाणी वीजखांब, वीजतारा तुटल्या आहेत. जळगाव शहरात मोठमोठे होर्डिंग्ज, फलक वीजतारांवर पडल्याने अधिक नुकसान झाले. तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळाले. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत बहुतांश भागांत वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. - गोपाळ महाजन, कार्यकारी अभियंता, महावितरण, जळगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.