Dhule : माय-लेकीची झोपेतच हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Late chandrabhaga Mahajan & vandanabai mahale

Dhule : माय-लेकीची झोपेतच हत्या

धुळे : तरवाडे (ता.धुळे) येथे माहेरी आलेल्या मुलीसह तिच्या आईचा रात्रीतून खून (Murder) झाला. सोमवारी (ता.२३) सकाळी माय-लेकींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या घटनेने गावात खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चंद्रभागा भावराव महाजन (वय-६५, रा. तरवाडे) व वंदनाबाई गुणवंत महाले (वय-४५, रा. कासोदा, अडगाव ता. एरंडोल) अशी खुनातील मृतांची (Death) नावे आहेत. (Mother Daughter was killed in her sleep Dhule Crime News)

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार तरवाडे येथील चंद्रभागा महाजन यांना दोन मुले असून ते स्वतंत्र राहतात. चंद्रभागाबाई चाळीसगावरोड लगत एका पत्र्याच्या शेडमध्ये चहाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होत्या. त्यांची मुलगी वंदनाबाई या गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी तरवाडे येथे आल्या होत्या. त्यांना दोन मुले व दोन मुली असून मुलांचे लग्न झाले आहे. दरम्यान, रविवारी (ता.२२) सायंकाळी नेहमीप्रमाणे काम आटोपून रात्री अकराच्या सुमारास चंद्रभागाबाई व वंदनाबाई या माय-लेकी पत्र्याच्या शेडमध्ये दोन स्वतंत्र खाटांवर झोपल्या. सकाळी मात्र, त्यांची हत्या झाल्याचे आढळून आले. त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. रात्रीतूनच त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर व मानेवर हत्याराने वार असल्याचे खुणा दिसून आल्या.

हेही वाचा: जळगावात उद्या ‘शून्य सावली दिवस’

माय-लेकीच्या खुनाची ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, तालुका पोलिसात ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे, प्रकाश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्‍वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र त्यापुढे जाऊ शकले नाहीत. ठसे तज्ज्ञांनी खाटेखाली पडलेल्या रक्तासह इतर काही ठिकाणांवरील ठसे घेण्याचा प्रयत्न केला. या माय-लेकीच्या खुनामागील घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही.

हेही वाचा: कारला कट लागल्याचा वाद विकोपाला; जमावाच्या मारहाणीत आईचा मृत्यू

Web Title: Mother Daughter Was Killed While Sleeping Dhule Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top