पुत्रवियोगाने मातेचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मालेगाव : मुलाचे पार्थिव नाशिकला येईपर्यंत कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यूची कल्पना आईस दिली नव्हती. अचानक मुलाचे पार्थिव बघताच अंजनाबाई यांना धक्का बसला व त्या जागीच कोसळल्या.

मालेगाव : सावकारवाडी (ता. मालेगाव) येथील रहिवासी व शिऊर (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील माध्यमिक शिक्षक देवीदास पवार (वय 48) यांचे विद्यालयात शिकवताना छातीत अचानक कळ आल्याने हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या आई अंजनाबाई पवार (65) नाशिकला वास्तव्यास असल्याने अंत्यविधी नाशिकला करण्याचे निश्‍चित झाले.

मुलाचे पार्थिव नाशिकला येईपर्यंत कुटुंबीयांनी आईस मुलाच्या मृत्यूची कल्पना दिली नव्हती. अचानक मुलाचे पार्थिव बघताच अंजनाबाई यांना धक्का बसला व त्या जागीच कोसळल्या. त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

मातेचे निधन झाले असताना मुलाची अंत्ययात्रा निघालेली होती. लेकाची अंत्ययात्रा पार पडताच लगेचच आईची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. काही मिनिटाच्या अंतराने मुलाच्या मृत्यूवियोगाने मातेनेही प्राण सोडला. शुक्रवारी ही घटना घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother dies in infancy