Dhule News : जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ : खासदार डॉ. सुभाष भामरे

While showing the green flag for the Developed India Sankalp Yatra, MP Dr. Subhash Bhamre. Mayor Pratibha Chaudhary, Collector Abhinav Goyal, Commissioner Amita Dagde-Patil, CEO Shubham Gupta, Gajendra Ampalkar etc.
While showing the green flag for the Developed India Sankalp Yatra, MP Dr. Subhash Bhamre. Mayor Pratibha Chaudhary, Collector Abhinav Goyal, Commissioner Amita Dagde-Patil, CEO Shubham Gupta, Gajendra Ampalkar etc.esakal

Dhule News : केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यास निश्चित मदत होईल, असा विश्‍वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथे व्यक्त केला.(MP Dr Subhash Bhamre statement of Development of Bharat Sankalp Yatra started in district)

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोचावेत, यासाठी केंद्र सरकारतर्फे विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. धुळे जिल्ह्यात या यात्रेचा बुधवारी (ता. २९) धुळे महापालिका आवारात खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बालविकास सभापती संजीवनी सिसोदे, उपमहापौर वैशाली वराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाठ, माजी महापौर चंद्रकांत सोनार, गजेंद्र अंपळकर यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

या वेळी डॉ. भामरे म्हणाले, की या संकल्प यात्रेच्या माध्यमातून पाच एलईडी व्हॅनमार्फत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.

While showing the green flag for the Developed India Sankalp Yatra, MP Dr. Subhash Bhamre. Mayor Pratibha Chaudhary, Collector Abhinav Goyal, Commissioner Amita Dagde-Patil, CEO Shubham Gupta, Gajendra Ampalkar etc.
Dhule News : बोरविहीर-नरडाणा रेल्वेच्या गैरसमजुतीवर पडदा; नागरी हक्क संरक्षण समितीची माहिती

ज्यांना अद्यापपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती याद्वारे पोचेल. जिल्हा प्रशासनाने यात्रेचे अत्यंत चांगले नियोजन केले आहे. गावागावांत लोकप्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहनही डॉ. भामरे यांनी केले.

योजनेच्या लाभासाठी यात्रा

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की यात्रेतील प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने २६ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये व्हॅन जाईल. ग्रामीण/शहरी/पालिकास्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत योजनांची माहिती पोचविणे आणि लाभार्थ्यास त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा हेतू आहे.

पात्र वंचित लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. महापौर श्रीमती चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी आभार मानले. वाहिदअली यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात समृद्धी चौधरी हीस आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले.

While showing the green flag for the Developed India Sankalp Yatra, MP Dr. Subhash Bhamre. Mayor Pratibha Chaudhary, Collector Abhinav Goyal, Commissioner Amita Dagde-Patil, CEO Shubham Gupta, Gajendra Ampalkar etc.
Dhule News : तापी नदीत ट्रक कोसळला; एक बेपत्ता

या योजनांची माहिती मिळणार

विकसित भारत संकल्प यात्रेत आयुष्मान भारत योजना, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल, जलजीवन मिशन, स्वामित्व योजना, जनधन योजना, जीवनज्योती योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणव, नॅनो फर्टिलायझर, सिकलसेल अभियान, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शल स्कूल, शिष्यवृत्ती योजना, वनहक्क दावे, वनधन विकास केंद्र योजना आदी योजनांची ग्रामीण भागात माहिती दिली जाईल, तर शहरी भागात पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई-बससेवा, सौभाग्य योजना, उजाला योजना, पीएम भारत जनऔषध परियोजना, डिजिटल पेमेंट, खेलो इंडिया, वंदे भारत ट्रेन व अमृत भारत स्टेशन योजनांची माहिती दिली जाईल.

While showing the green flag for the Developed India Sankalp Yatra, MP Dr. Subhash Bhamre. Mayor Pratibha Chaudhary, Collector Abhinav Goyal, Commissioner Amita Dagde-Patil, CEO Shubham Gupta, Gajendra Ampalkar etc.
Dhule News: अवकाळीच्या धसक्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com