MPSC Exam News : MPSC परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी | MPSC Exam Centre Entry into area prohibited Examination on Sunday from 7 AM to 6:30 PM Nandurbar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC News

MPSC Exam News : MPSC परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Nandurbar News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी (ता. ४) नंदुरबार येथे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रात गैरप्रकार होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. (MPSC Exam Centre Entry into area prohibited Examination on Sunday from 7 AM to 6:30 PM Nandurbar News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर ज्युनियर कॉलेज, स्टेशन रोड, नेहरु चौक, जी. टी. पाटील महाविद्यालय, आयटीआयजवळ, शनिमंदिर रोड, श्रीमती डी. आर. हायस्कुल, मुख्य डाक कार्यालयाजवळ, अंधारे स्टॉप, कमला नेहरु कन्या विद्यालय, स्टेशन रोड, नेहरु चौक, डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, मुख्य डाक कार्यालयाजवळ, अंधारे स्टॉप अशा ५ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा कालावधीत सकाळी ७ ते सायंकाळी साडेसहापर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रापासून २०० मिटरच्या परिसरात प्रवेशास बंदी असेल. परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांच्यासाठी हे आदेश लागू होणार नाहीत.

तसेच, परीक्षा केंद्राजवळ २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठीही या कालावधीत मनाई असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.