Jalgaon bus stand
sakal
जळगाव: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीचा प्रवास करणाऱ्यांना आता स्मार्टकार्ड काढणे अनिवार्य केले आहे. यानुसार कार्ड काढण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष जळगाव बसस्थानकावर सकाळपासून पोहोचले होते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि अपुरी व्यवस्था यामुळे आलेल्या सर्वांनाच नोंदणी न करताच निराश होऊन परत जावे लागले आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता.