वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुक्ताईनगर - सुकळी (ता. मुक्ताईनगर) शेती शिवारातील (गट क्रमांक 48) केळीच्या बागेत आज सकाळी सतरावर्षीय वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकलेले नाही. मात्र, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघिणीस जीव गमवावा लागल्याचा वन्यजीवप्रेमींनी आरोप केला आहे.

सुकळी शिवारातील आपल्या शेतात जयराम पाटील आज सकाळी अकराला गेले. तेव्हा त्यांना केळीच्या बागेत वाघ झोपलेला असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच वन विभागाला याबाबत माहिती दिली.

Web Title: muktainagar news tiger suspected death