Municipal Election
sakal
महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदाचे चित्र अत्यंत वेगळे आणि चुरशीचे पाहायला मिळत आहे. या प्रभागाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे रिंगणात एकही अपक्ष उमेदवार नाही. सर्व १३ उमेदवार हे प्रमुख राजकीय पक्षांचे असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सिंधी आणि बहावलपुरी समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.