Chalisgaon Municipalitysakal
उत्तर महाराष्ट्र
Chalisgaon Municipality : करवसुलीसाठी पालिका ‘ॲक्शन मोड’वर
शहरातील मालमत्ताधारकांकडे असलेल्या विविध करांच्या वसुलीसाठी नगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर आली आहे.
चाळीसगाव- शहरातील मालमत्ताधारकांकडे असलेल्या विविध करांच्या वसुलीसाठी नगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. थकबाकीधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम भरत नसल्याने पालिकेने मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली आहे. त्यानुसार, सोमवारी (ता. ३) पालिकेच्या पथकाने शहरातील तीन गाळे ‘सील’ केले.
