मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 18 December 2019

विवेक पगारे (रा. राजवाडा, देवळाली गाव) याचा आणि आरोपींत पूर्वीपासून वाद होता. हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी रितेशने मृत विवेकला ठार करण्याची धमकी दिली होती. 13 फेब्रुवारी 2015 ला एका लग्नसोहळ्यात आरोपी रितेश, दीपक आणि मृत विवेक हे सोबतच होते. रात्री आठला एका दारूच्या दुकानात विवेकच्या भावाने त्यांना शेवटी पाहिले होते. विवेकला रितेश त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने विवेकला पुन्हा दारू पाजली.

नाशिक : दोन दिवस बेपत्ता झालेल्या युवकाचा त्याच्याच मित्रांनी पूर्ववैमनस्यातून निर्घृणपणे खून केला आणि त्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून दिला. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, एकाची पुराव्याअभावी सुटका केली. ही घटना 13 फेब्रुवारी 2015 ला मध्यरात्री घडली होती. 

असे काय केले होते मित्राने....

मृत विवेक पगारे (रा. राजवाडा, देवळाली गाव) याचा आणि आरोपींत पूर्वीपासून वाद होता. हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी रितेशने मृत विवेकला ठार करण्याची धमकी दिली होती. 13 फेब्रुवारी 2015 ला एका लग्नसोहळ्यात आरोपी रितेश, दीपक आणि मृत विवेक हे सोबतच होते. रात्री आठला एका दारूच्या दुकानात विवेकच्या भावाने त्यांना शेवटी पाहिले होते. विवेकला रितेश त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने विवेकला पुन्हा दारू पाजली. त्यानंतर संगनमताने त्यांनी विवेकचा गळा आवळला आणि सुऱ्याने गळ्यावर भोसकून खून केला. त्यांनी बेडशीटमध्ये त्याचा मृतदेह गुंडाळून प्लॅस्टिकच्या पोत्यात टाकला आणि ते पोते सार्वजनिक शौचालयाच्या टाकीमध्ये टाकले. दोन दिवस विवेक घरी न आल्याने नाशिक रोड पोलिसांत बेपत्ताची तक्रार देण्यात आली. यादरम्यान विवेकचा शोध सुरू असताना आरोपींसमवेत तो शेवटचा दिसल्याच्या संशयावरून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपींना 16 फेब्रुवारी 2015 ला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणी तिघांविरोधात नाशिक रोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला, तर तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस. एम. खैरनार यांनी गुन्ह्याचा तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

PHOTO : पहाटे शेतावर गेलेली महिला तीन दिवसांपासून परतलीच नाही...शोध लागल्यावर ग्रामस्थांना धक्का..

दोघा मित्रांना जन्मठेप, एकाची मुक्तता

खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षातर्फे ऍड. शिरीष कडवे यांनी 21 साक्षीदार तपासले. यात विवेकचे वडील, भाऊ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध झाल्याने रितेश व दीपक यांना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर राहुल भालेराव याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के. एस. दळवी, पोलिस नाईक एस. यू. गोसावी यांनी पाठपुरावा केला. रितेश ऊर्फ राजन जनाजी भालेराव (वय 21, रा. इंदिरा विकासनगर, देवळाली गाव, राजवाडा, नाशिक रोड), दीपक छगनराव जाधव (22, रा. इंदिरा विकासनगर, देवळाली गाव, राजवाडा, नाशिक रोड) असे दोघा आरोपींचे नाव असून, राहुल जनाजी भालेराव (19) याची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

हेही वाचा > लग्नाच्या वाढदिवस होता 'त्याचा' त्यादिवशी..अन् अचानक हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश 

नक्की बघा > PHOTO : अरे बापरे! म्हशीच्या पोटातून 'हे' काय निघाले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder case of a youth in Deolali village crime Nashik Marathi News