Dhule Crime News : सांगवीजवळ अनोळखी पुरुषाचा खून

murder
murderesakal

Dhule Crime News : सांगवी (ता. शिरपूर) येथील लालमातीजवळ झुडपात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सोमवारी (ता. ८) सकाळी आढळला. त्याचा घातपाती मृत्यू झाल्याचा संशय असून पोलिसांनी खुनाच्या प्रकारास दुजोरा दिला आहे.

अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. (Murder of unknown man near Sangvi Dhule Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

murder
Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला फेकलं विहिरीत

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.८) सकाळी ग्रामस्थांना लालमाती गावाजवळ झुडपांमध्ये मृतदेह आढळला. त्यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली. सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सुमारे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुष मृतावस्थेत आढळला. पुरुषाच्या उजव्या मांडीजवळ भाजल्याची मोठी खूण असून त्याच्या गळ्यावर आवळल्याचेही दिसून आले. मृताजवळ ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू न आढळल्याने पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी सांगवी ते मध्य प्रदेशातील सेंधवा शहरापर्यंतचा परिसर पिंजून काढला.

मात्र त्याचे नाव निष्पन्न झाले नाही. परिसरातील रहिवाशांनी मृत तेथील रहिवासी नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा अन्यत्र खून करून लालमातीजवळ फेकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक ए. एस. आगरकर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. फॉरेन्सिक चमू व प्रशिक्षित श्वानालाही पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

murder
Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com