अबब...समोरील दृष्य पाहताच...वाहनधारकांच्या अंगावर आले शहारे ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

अचानक समोर वाघोबाचे दर्शन झाल्याने दोन्ही बाजूच्य वाहनधारकांचे होश उडाले. आणि काही क्षणासाठी समोरील दृष्य पाहल्याने वाहनधारकांचे अंगावर शहारे येवून एकच खळबळ उडाली.

नंदुरबार ः ठाणेपाडा (ता. नंदुरबार) गावाजवळील साक्रीकडे घाटातून जात असतांना अचानक समोर वाघोबाचे दर्शन झाल्याने दोन्ही बाजूच्य वाहनधारकांचे होश उडाले. आणि काही क्षणासाठी समोरील दृष्य पाहल्याने वाहनधारकांचे अंगावर शहारे येवून एकच खळबळ उडाली. मात्र या परिसरात वाघ नसल्याचा दावा वनविभागाने केला असून बिबट्या असल्याची शक्‍यता वर्तविली आहे. मात्र प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार तो वाघच असल्याचा दावा केला जात आहे. 

ठाणेपाड्याच्या घाटातून जात असताना नंदुरबार नगरपालिकेतील भाजप गटनेते तथा नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांना वाघोबाचे दर्शन घडले. यावेळी त्याच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष पुखराज जैन, आर्किटेक्‍ट सचिन साळी, मदनभाई राजपूत हेही होते.श्री. कळवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहनाच्या पुढेच काही अंतरावर पट्टेदार वाघ रस्ता ओलांडताना दिसला. त्याचा फोटो काढण्यासाठी आम्ही मोबाईल घेणार तोपर्यंत मात्र तो झुडपांमध्ये जाऊन उभा राहिला. तसेच काही वेळ रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनधारकांकडे तो पाहात राहिला. नंतर दाट झाडांमधून वाघ निघून गेला. ठाणेपाडा गाव परिसर 
डोंगराळ, वनराई आणि दाट झाडीचा आहे. नंदुरबार शहरापासून साधारण किलोमीटर अंतरावर ठाणेपाडा गाव आहे. वाघ शहराजवळ आल्याच्या कल्पनेने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nadurbar marathi news thanepada appearance of the tiger