Nagali Crop : आदिवासींसाठी नागलीचे पीक तारणहार!

Nachani
Nachani esakal

वार्सा (जि. धुळे) : आदिवासीबहुल साक्री तालुक्यात तांदळाच्या उत्पादनानंतर नाचणी अर्थात नागली दुसऱ्या क्रमांकाचे पीक (Crop) मानले जाते.

असे हे प्रमुख पीक पिंपळनेरच्या पश्‍चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरले आहे. (Nagli is considered to be second largest crop after rice production in tribal dominated Sakri taluka dhule news)

नागलीत अद्याप हायब्रिड भिजवावी (वाण) पाहावयास मिळत नाही. परिणामी, गावरान भिजवावी अर्थात बियाण्यामुळे उत्पादन थोडे कमीच असते. ते सरासरी ३० ते ३५ रुपये किलोने विक्री होते. या पिकाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे.

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात आजही मुख्य पीक जरी भात राहिले, तरीही दुसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणजे नागली (नाचणी) पिकविली जाते. ती सफेद व लाल रंगात असते.

नागलीचे महत्त्व

नागलीतील गुणधर्म, सत्त्व लहान बाळांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत लाभदायक ठरते. तांदूळ, गहू, ज्वारीपेक्षा अधिक पटीने नागलीत पोषकद्रव्ये असतात. त्यामुळेच नागलीचे लाडू, भाकरी, पापड, बिस्किटे, अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून पौष्टिक सत्त्वे मिळतात.

रोजच्या जेवणात भात, पोळी, भाजी, आमटी, कोशिंबिरीचा समावेश असतो. तृणधान्य हा आहारातील महत्त्वाचा घटक आहे. गहू, तांदूळ, ज्वारीचा आहारात जास्त प्रमाणात वापर होत असला तरी याशिवाय आरोग्यासाठी उपयुक्त अशी धान्येही आहेत. यात बाजरी, राजगिरा, बार्ली, नाचणीचा समावेश होतो. नाचणी म्हणजेच नागली आरोग्यासाठी उपयुक्त असून, त्याचे नेमके शारीरिक फायदे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Nachani
Wedding Customs : खर्चिक अन् अनिष्ट प्रथांना दूर ठेवून होणार शुभमंगल!

नागलीची लागवड

नागलीसाठी प्रथम जमिनीची भाजणी केली जाते. बिजवाई टाकून रोप तयार केले जाते. नंतर महिन्यात लागवड केली जाते. पाण्याच्या निचरा होणाऱ्या जमिनीत ही लागवड केली जाते. त्यासाठी मजुरांची अधिक गरज लागते. नागलीची काढणी करताना बैलांच्या मदतीने मळणी केली जाते.

मग नागली तयार करून तिची रास म्हणजेच धान्याचा ढीग केला जातो. त्याची विधिवत पूजा केली जाते. त्या वेळी मद्याची बाटली, तसेच कोंबडा, कोंबडीचा वापर होतो. कोंबड्याच्या मटणावर पुरुष, तर कोंबडीच्या मटणावर महिला ताव मारतात. अशी ही कणसरा मातेची (नाचणी) कहाणी असल्याचे आदिवासी शेतकरी सांगतात.

अनेक पदार्थांतून रोजगार

नागलीपासून पापड, नागली सत्त्व, नागलीची बिस्किटे, नागलीचे लाडू असे विविध पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. या माध्यमातून बचतगटांना चालना मिळाली असून, त्यांना या उत्पादनातून आर्थिक मिळकत घेता येत आहे. तसेच रोजगारालाही वाव मिळत आहे.

नागलीची भाकरी व लसणाची चटणी, नाचणीचे लाडू, नाचणीचे धिरडे, नाचणी सत्त्व, नागलीचे पापड असे अनेक रुचकर पदार्थ बनविले जातात. ते आहारातही समाविष्ट होतात. नागलीचे पापड व वडे अनेक दिवस टिकूनही राहातात. सफेद नागली मधुमेहाच्या रुग्णांना, तसेच नागली ही गरोदर माता, लहान बालकांना आणि हाडांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जाते.

Nachani
Nandurbar News : तळोद्यात वाहनांच्या गर्दीला नियोजनाची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com