घरातून कठोर विरोध असतांनाही त्याने जोपासली आपली कला!

nana gangurde.jpg
nana gangurde.jpg

नाशिक : बालपणीच गाणे रचण्यात वेड हे पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) येथे राहणा-या गीतकार, शीघ्रकवी, गायक नाना पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या आयुष्यातील कित्येक चढउतारास कारणीभूत ठरले. सकाळ-सायंकाळ गायन व गीत रचण्याच्या त्यांच्या व्यासांगाला घरातूनच बेसुमार विरोध होता. या विरोधापाई नानाला ऐन तारुण्यात स्वतःचे कित्येकदा घर सोडावे लागले. घरापासून कित्येक वर्षे दूर राहूनही त्यांनी घेतलेला कलेचा वारसा सोडला नाही. कित्येकदा या विरोधातून, केलेल्या रचलेल्या गीतांच्या वहीची होळी झाली तरी वेड मात्र जाईना.अश्या कलासक्त नानाने रचलेल्या गीतांना एका आगामी मराठी चित्रपटात वाव मिळाला. कायम पडद्याआड असलेला नाना आता गायक, गीतकार, कलावंत म्हणून आपल्यासमोर येणार आहे.

मी लिहिलेलं गाणं मीच गाणार 
स्वतःच्या पोटापाण्यासाठी शेतीबरोबर फेब्रिकेशनच्या कारागिरीबरोबर कलेचे अपार वेड असलेल्या नाना गांगुर्डे सारख्या कलावंताने स्वतःतील अंगीभूत गुणांना वयाच्या ४२ व्या वर्षीही टिकवून ठेवले आहेत. कित्येक सामाजिक गीतांच्या रचना करणाऱ्या नानाने आपल्या गीतांचा कुठेही बाजार होऊ दिला नाही. मात्र मी लिहिलेलं गाणं मीच गाणार या त्याच्या मागणीला मात्र आता "सपाण सरल"या मराठी चित्रपटात वाव मिळाला आहे.
      

"पोरभर रोटीसाठी दिसभर वणवण
,
पिकवून शेतीपोती,तरी घर सून-सून,
        
अन्नविना पोटगोळ,उपाशी निजलया"
       
"सपाण सरल,सपाण सरल,गा,

विविध सामाजिक विषयांवर कविता
नानाने अशा कित्येक रचना कष्टकरी शेतकरी, मजूर, शोषितांच्या मुद्द्यांवर रचना केल्या आहेत. शेती करणाऱ्या सामान्य कुटुंबातील नाना गांगुर्डे अगदी साधासुधा व्यक्ती,आपले काम भले व आपण असा हा व्यक्ती, नेहमी दुसऱ्याला योग्य सल्ला देणारा या व्यक्तीची छाप पूर्णपणे त्यांनी रचलेल्या गीतांमध्ये दिसून येत आहे. माणसाच्या मनाचा व समाजाच्या अडचणींचा ठाव घेणाऱ्या कित्येक रचना, गण-गौळणी, लावणी गीते नानाने रचली आहेत. प्रसिद्ध गीतकार विनायक पाठारे, विजयराज निकम यांचे मार्गदर्शन अभिप्राय लाभला आहे .

"हे फालतू उडद्योग सोड" म्हणून कित्येकदा खडसावले
नाना म्हणतो "कलावंतांना घरदारातून,समाजातून नेहमी विरोधाला अवमानाला तोंड द्यावं लागतं, त्याला समजून घेतलं जातं नाही, कित्येक कलावंतांकडे पुरता रोजगार ही नाही. त्यामुळे त्यांच्या कलेला घरातूनच साथ मिळत नाही" मी ऐन तारुण्यात घर सोडून तमाशानगरी नारायणगाव (पुणे) येथे अंजु मंजू तमाशात कलावंत म्हणून रुजू झालो, या तमाशासाठी अनेक लावणी गीते, गण लिहिले. कित्येक रचना या तमाशा साठी रचल्या गायल्या, मात्र तमाशा कलावंतांचे हाल बघून मी ही हेलावलो होतो, मात्र ३ महिन्यानंतर हा तमाशा फड ही बंद पडला. त्यावेळी मात्र घरच्यांनी गाणं व तमाशाच्या नादामूळ "हे फालतू उडद्योग सोड" म्हणून कित्येकदा मला खडसावले, मात्र वेड जाईना, तमाशा बंद झाला, रोजगाराच्या शोधात थेट जुन्नर गाठले, खिश्यात असलेले २० रुपये संपल्याने, खाली एका दर्ग्यात झोपलो, तिथे आलेल्या जेष्ठ व्यक्तीने मला कामाला लावले व तिथेच राहायची सोय केली "केवळ घरातून निघून गेल्यावर ६ वर्षे मोठ्या अडचणीत काढली.आधी वेळ केवळ माझ्या कलेला मिळणारी वागणुकीमुळ मी घराबाहेर होतो. त्यानंतर हिंदी गजल सह अनेक रचना केल्या.आजही माझ्या अडचणी संपल्या नसल्याचे नाना ने सांगितले.लोखंडी कारागिरीमुळ शारीरिक त्रास होतो मात्र घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मी माझ्या कलेसाठी ही वेळ काढत आहे.

अनेक कलावंतांना अनेक संकटाशी झगडून स्वतःला सिद्ध करावे लागते
दरम्यान नाना गांगुर्डे सारख्या कलासक्त कलावंतांप्रमाणे अनेक कलावंतांना अनेक संकटाशी झगडून स्वतःला सिद्ध करावे लागत आहे, कलेच्या वेडापायी कित्येक कलावंतांना कधीही सामाजिक प्रतिष्टा मिळत नाही. हे वास्तव जगणाऱ्या अनेक कलासक्त कलावंतांच्या नशिबी वनवासच आहे.

प्रतिक्रिया
नाना गांगुर्डे हे कामानिमित्त सातपूर येथे राहत होते, मात्र आम्हाला त्यांचा परिचय नव्हता,आमचा कवी मित्र सुरेश ताठे (माळेगाव ता.त्रंबकेश्वर) या मित्राने माझी व नानाची ओळख करून दिली, नानांची गिते बघून त्यांना आमच्या चित्रपटासाठी शीर्षक गीत,व ओवी लिहायला त्यांना विनंती केली, त्यांनी माझी गाणी मीच गाणार या अटीवर त्यांनी होकार दिला,त्यांना सध्या निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या "सपाण सरल" या सामाजिक विषयावरील मराठी चित्रपटात कलावंत,गीतकार,गायक,व मुख्य संवाद लेखनाची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. अन त्यांच्यां सहभागाने आम्हाला नाना सारख्या प्रेरणादायी व अष्टपैलू कलावंताची ओळख झाली.नाना हा नाशिकच्या कलेतील एक मानाच व्यक्तिमत्व आहे  - आनंद पगारे.(निर्माता व दिग्दर्शक)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com