नांदगाव: स्मशानभूमीत मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी; हे ‘सकाळ’मध्ये ठळक वृत्त प्रसिद्ध झाले. वृत्त प्रसिद्ध होताच, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, कर निरीक्षक राहुल कुटे यांनी दखल घेत उपाययोजनांना चालना दिली. बंद पडलेले पथदीप व पूर्ववत सुरु करण्यात येऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पथदिपांची दुरुस्ती करण्यात आली. ज्या ठिकाणी वारंवार चोऱ्या होतात त्याठिकाणी सीसीटीव्ही पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.