Vidhan Sabha 2019 : नांदगावमध्ये एकूण १५ उमेदवार १३ माघार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी चे पंकज भुजबळ शिवसेनेचे सुहास कांदे व भाजपाचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांच्या सह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

नांदगाव : विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी चे पंकज भुजबळ शिवसेनेचे सुहास कांदे व भाजपाचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांच्या सह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आपण पक्षाचा आदेश मानून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. भाजपाचेच मात्र अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार पंकज भुजबळ जि.प.सदस्य जे.डी.हिरे व जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ यांनी माघार घेताना आम्ही पक्षासोबत असल्याचे स्पष्टीकरण दिले.अन्य उमेदवारांत बहुजन वंचीत आघाडीचे राजाभाऊ पगारे आपचे विशाल वडघुले हेही निवडणूक रिंगणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nandgaon, a total of 13 candidates are withdrawn