Nandurbar Municipality News : नंदुरबार पालिकेच्या 230 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी

Nandurbar : नंदुरबार पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली.
Budget
Budgetesakal

Nandurbar Municipality News : नंदुरबार पालिकेच्या सभेत लेखाधिकारी वैशाली जगताप यांनी सादर केलेल्या २०२४-२०२५ या वर्षाच्या २२९ कोटी ७१ लाख ८६ हजार ६८६ रुपयांच्या प्रस्तावित अंदाजपत्रकास व १५ कोटी ३२ लाख ६२ हजार ५९२ रुपये इतक्या रकमेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

नंदुरबार पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. (Nandurbar 230 crore budget of Nandurbar Municipality approved)

अंदाजपत्रकात मालमत्ता फेरआकारणी कामकाज सुरू असून, नवीन मालमत्तांवर करआकारणी केली जाणार असल्याने उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. पालिकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कामध्ये वाढ प्रस्तावित आहे.

महिला व बालकल्याण, अपंग कल्याण निधी, आर्थिक दुर्बल घटक निधीची तरतूद केली आहे. नागरिकांचे हित पाहता सर्व सुविधांनीयुक्त अंदाजपत्रक तयार केले आहे. अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदी आगामी वर्षात पूर्ण केल्या जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. कोणत्याही तरतुदी अपूर्ण राहणार नाहीत. (latest marathi news)

Budget
Nandurbar News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय मैलाचा दगड

अंदाजपत्रकातील काही विशेष तरतुदी

महसुली जमा रक्कम रुपये महसुली खर्च रक्कम रुपये

कर महसूल १६,४५,६०,००० आस्थापना खर्च ३३,११,७८,८६९

अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई ११,७५,००० प्रशासकीय खर्च ३१,७२,५०००

महसुली अनुदाने, अंशदान आणि अर्थसहाय्य ३२,४१,६८,००० व्याज व वित्त आकार १,२०,०००

मालमत्तेपासून भाड्याचे उत्प्पन्न १,४६,७०,००० मत्तांची दुरुस्ती व परिरक्षण ९,९७,५०,०००

फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड २,३२,२९,००० व्यवहार आणि कार्यक्रम अंमलबजावणीकरिता खरेदी ८,८७,४०,०००

विक्री व भाडे आकार ११,२०,००० दिलेली महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय्य १,३४,१०,२२५

व्याजापासून उत्पन्न २८,००,००० तरतुदी आणि निर्लेखित करणे ००

समर्पित ठेवी/ना-परतावा ठेवी १०,००,००० राखीव निधी आणि संकीर्ण खर्च ७५,७५,००,०००

इतर उत्पन्न १,४७,००,०००

भांडवली जमा ०० स्थिर व जंगम मालमत्ता १४,२७,९००,०००

विशिष्ट प्रयोजनासाठी अनुदाने, अंशदाने १०२०५००००००- प्रगतिपथावरील भांडवली काम ००

सुरक्षित आणि असुरक्षित कर्जे ०० गुंतवणुका ००

प्राप्त ठेवी ९८०००००० हातात असलेला साठा ००

शासनाच्या वतीने वसुली ०० किरकोळ रुणको ००

इतर दायित्वे ०० कर्ज अग्रिम आणि ठेवी ७६००००००

एकूण जमा - १६७६४९७००० एकूण खर्च २१४४५२८०९४

आरंभची शिल्लक ६२१२८९६८६ अखेरची शिल्लक १५३२६२५९२

शिल्लकेसह २२९७७८६६८६ शिल्लकेसह - २२९७७८६६८६

Budget
Nandurbar News : दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्मवर बॅटरी ऑपरेटेड गाड्या देणार : खासदार डॉ. हीना गावित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com