moneyesakal
उत्तर महाराष्ट्र
Nandurbar News : 10 दिवसांत 385 थकबाकीदारांनी भरले 24.91 लाख; धुळ्यात 6 लाख 59 हजार 210
Nandurbar : वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरण कंपनीने अभय योजना-२०२४ सुरू केली आहे.
नंदुरबार : कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरण कंपनीने अभय योजना-२०२४ सुरू केली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडळात योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना सुरू झाली. मागील केवळ दहा दिवसांत परिमंडळातील ३८५ ग्राहकांनी २४ लाख ९१ हजार रुपयांचा भरणा करून योजनेत सहभाग नोंदविला. (24 lakhs paid by 385 defaulters in 10 days of electricity )

