
नंदुरबार : नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसह हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या पथकाने शनिवारी (ता. १९) ही कारवाई केली. दोन ते तीन व्यक्ती काही महिलांसोबत संशयास्परित्या सोबत असल्याच्या माहितीवरुन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे छापा टाकला. (4 suspects including hotel owner arrested by suburban police in raid on hotel running prostitution business )