
तळोदा : तळोद्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी चांगले उत्पादन आले होते व मिरचीला भावही चांगला मिळाला होता. त्यामुळे यंदाही तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. सध्या मिरचीची तोड सुरू असून, मिरचीला ५० ते ६० रुपये दर आहे. मात्र सततच्या पावसाने मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचे एकरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे मिरचीला चांगला भाव असूनही पावसामुळे ‘लई नुकसान झाले राव’ असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Agriculture Acre yield of chillies decreased in Taloda area )