Nandurbar Assembly Constituency : विधानसभेतील वैराचे, लोकसभेत मैत्रीत रूपांतर!

Assembly Constituency : विधानसभेतील कटूता मात्र यंदाच्या लोकसभेतील निवडणुकीत मैत्रीत रूपांतर झाल्याचे चित्र सध्या दिसून आले.
adv k.c Padvi and chandrakant raghuvanshi
adv k.c Padvi and chandrakant raghuvanshi esakal

Nandurbar Assembly Constituency : अक्कलकुवा धडगाव मतदारसंघातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ॲड. के. सी. पाडवी यांच्या विरोधात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आमश्या पाडवी यांना उमेदवारी देत पूर्ण ताकदीने मदत करून पूर्वीचे मित्र असलेल्या के. सी. पाडवी यांच्या विरोधात दंड थोपटले होते. तेव्हाच्या विधानसभेतील कटूता मात्र यंदाच्या लोकसभेतील निवडणुकीत मैत्रीत रूपांतर झाल्याचे चित्र सध्या दिसून आले. ( Enmity in Legislative Assembly turned into friendship in Lok Sabha )

सध्याचे शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसमध्ये असताना सर्व राजकीय घडामोडीचे सूत्र त्यांच्या हाती होते. काँग्रेसमधील रघुवंशी यांच्या शब्दाला मानणारे होते. ॲड. के. सी. पाडवी हे तर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जात होते. के. सी. पाडवी व चंद्रकांत रघुवंशी यांच्यात महाविद्यालयीन प्रमुख निवडण्याच्या निवडणुकीवरून आमने सामने लढत झाली होती. विरोधक म्हणून समोर निवडणूक लढवणारे हेच दोघे नेते पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जवळचे मित्र बनले होते.

त्यातच काँग्रेससारख्या मोठ्या पक्षात हे दोघेही मित्र एकत्र असल्यामुळे दोघांमध्ये अत्यंत जवळीक झाली होती. मात्र अनेक वर्षाच्या जवळच्या मैत्रीला श्री. रघुवंशी यांच्या २०१९ ला पक्षांतरानंतर कटूता आली. २०१९ ला शिवसेनेचे नेते म्हणून धडगाव - अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात श्री. रघुवंशी यांनी आमश्‍या पाडवी यांना उमेदवारी देऊन पूर्ण ताकदीने त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला.

हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून त्या ठिकाणी ॲड. के. सी. पाडवी हेच उमेदवार असतात. श्री पाडवी हे श्री. रघुवंशी यांचे मित्र असले तरी पक्ष आदेश आणि निष्ठा लक्षात ठेवून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची त्यांची जबाबदारी वाढली होती. त्यामुळे त्यांनी मित्र समोर असला तरी पक्ष म्हणून आमश्‍या पाडवी यांना पूर्ण ताकदीने मदत केली. मात्र काही फरकाने आमश्‍या पाडवी पराभूत झाले.

adv k.c Padvi and chandrakant raghuvanshi
Niphad Assembly Constituency : निफाडमध्ये कमळाचा सुगंध की तुतारीचा निनाद?

उमेदवार पराभूत झाला असला तरी त्यांचे मित्र असलेले के. सी. पाडवी यांच्या मनात श्री. रघुवंशी यांच्याविषयी कटुता निर्माण होऊन दोन्हीही नेत्यांमध्ये अबोला झाला होता. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांपासून दुरावले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत ॲड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी निवडणुकीत उतरल्या.

पुन्हा श्री.रघुवंशी यांनी सौ. पाडवी यांच्यासमोर शिवसेनेचे गणेश पराडके यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. सौ. पाडवी पराभूत झाल्याने पुन्हा ॲड. पाडवी यांना श्री रघुवंशी यांच्याविषयी वाईट वाटले. पुन्हा ते एकमेकांविषयी विरोधात बोलू लागले.घट्ट मैत्री असलेले हे दोघे राजकीय घडामोडीतून विरोधक बनले होते. तब्बल पाच वर्षे उलटत असतानाच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे दोघांची कटूता काही अंशी कमी झाली.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीला विरोध होता. ही संधी हेरून ॲड. के.सी. पाडवी यांनी श्री. रघुवंशी यांच्याशी जवळीक साधली. मागील कटूता विसरून निवडणुकीत आम्हाला मदत करा, अशी विनंती केली. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना महायुतीत मित्रपक्ष असले तरी गावित कुटुंबाकडून श्री. रघुवंशी यांना हीना गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विश्वासात घेतले गेले नाही.

त्यामुळे गावित कुटुंब व श्री. रघुवंशी यांच्यातील वादामुळे ॲड. के. सी. पाडवी यांनी संधी साधली. श्री. रघुवंशी यांच्याशी जुळवून घेत पाडवी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावित कुटुंबाला विरोध म्हणून गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी मदत घेतली. श्री. रघुवंशी यांनी उघडपणे सहकार्य केले नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज मात्र ॲड. के.सी. पाडवी यांच्यासोबत होती, हे सर्वश्रुत आहे. ॲड. के. सी. पाडवी काँग्रेसमध्ये तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत असले तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये झालेली कटुता मात्र लोकसभेच्या निवडणुकीचा निमित्ताने एकत्र आल्यामुळे दूर झाल्याचे चित्र आहे.

adv k.c Padvi and chandrakant raghuvanshi
Nandurbar Assembly Constituency : धडगाव तालुक्याची साथ विकासाला की गावाकडील उमेदवाराला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com