
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत बुधवारी (ता. २०) सरासरी ७५ टक्के मतदान झाले. नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर सर्वांत कमी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात सायंकाळी पाचपर्यंत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तीन लाख १९ हजार ४३९ पैकी एक लाख ९१ हजार ६६४ मतदारांनी मतदान केले.