
तळोदा : वाहने खड्ड्यांमध्ये आदळू नयेत व वाहनधारक जायबंदी होऊ नये म्हणून नागरिकांनी शहरातील रस्त्यांवर वेगळीच शक्कल लढविली आहे. त्यात शहरातील खड्ड्यांमध्ये कुठे झाडांच्या फांद्या, तर कुठे प्लॅस्टिकचे कागद व कागदी खोके टाकून वाहनधारकांना सतर्क केले जात आहे, तर दुसरीकडे मेन रोडवरील स्वामी समर्थ केंद्रासमोर पडलेल्या खड्ड्यांत वाहने आदळू नयेत म्हणून तेथे उभे असलेले नागरिक वाहनधारकांना इशारा करत वाहन हळू नेण्याचे सुचवीत आहेत. त्यामुळे पडलेले खड्डे व नागरिकांनी त्यावर केलेला उपाय सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (Citizens find solution to potholes drop branches plastic papers boxes)