सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकास अटक | crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकास अटक

नंदुरबार : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्‌स ठेवून समाजातील भावना दुखाविणाऱ्या युवकास नंदुरबार शहर पोलिसांच्या पथकाने अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे स्टेट्‌स ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.

बुधवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास नंदुरबार शहरात राहणारा गणराज एअरटेल नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲपवर धार्मिक भावना दुखावल्या जाऊन, धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कारवाईचे आदेश दिले.

त्यावरून नंदुरबार शहर ठाण्याच्या पोलिस अंमलदारांनी शोध घेऊन त्या व्यक्तीस गुरूकुलनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याचे नाव गजानन ऊर्फ गणराज भास्कर कुवर (वय २०) असे आहे. त्याचा मोबाईल जप्त करुन त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व त्यास अटक करण्यात आली. त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.

हेही वाचा: भादलीगाव रात्रभर चोरट्यांच्या ताब्यात

फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या, दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करू नये. त्याबाबत सोशल मीडियावर स्टेट्‌स ठेवू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट प्रसारित करताना कोणीही आढळून आल्यास गय केली जाणार नाही.

-पी . आर . पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

हेही वाचा: जळगावातून अपहरणानंतर तरुणाचा मध्यप्रेदशात खुन

Web Title: Nandurbar City Police Team Arrested A Youth For Posting Offensive Statuses On Social Media In Nandurbar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top