.avif?rect=0%2C0%2C480%2C270&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nandurbar Assembly Election : जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चारही विधानसभा मतदारसंघांची १ जुलै २०२४ या अर्हता तारखेवर आधारित अंतिम मतदारयादी शुक्रवारी (ता. ३०) प्रसिद्ध करण्यात आली. त्यात चारही मतदारसंघात प्रारूप यादीनुसार १२ लाख ८२ हजार ३३३ मतदारांची नोंद होती. पुनरनिरीक्षणात चारही मतदारसंघातून १४ हजार ६५५ मतदारांची वाढ झाली आहे. आता मतदारांच्या अंतिम यादीनुसार १२ लाख ९६ हजार ९८८ मतदारांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली आहे. (Collector Dr Mithali Sethi statement of Increase of 14 thousand 655 voters in all four assembly constituencies )