Nandurbar Crime News : आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाकडील घरफोडीत दागिन्यांसह रोकड लंपास; शहादा येथील घटना

Crime News : एक लाख ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने तसेच आठ तोळ्यांचे चांदीचे दागिने घराचा कडीकोयंडा कटरने तोडून लंपास केले.
Kadikoyanda broken by the thieves and in the second picture the wooden cupboard was broken and the goods were messed up.
Kadikoyanda broken by the thieves and in the second picture the wooden cupboard was broken and the goods were messed up.esakal

Nandurbar Crime News : येथील सप्तशृंगी मंदिरासमोरील गोविंदनगर कॉलनीत चोरट्यांनी गुरुवारी (ता. ४) रात्री एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे भाडेकरू असलेले व्यावसायिक यांच्याकडे एक लाख ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने तसेच आठ तोळ्यांचे चांदीचे दागिने घराचा कडीकोयंडा कटरने तोडून लंपास केले. (Ashram school Principal house burglarized with jewelry and cash looted)

शहरातील सप्तशृंगी मंदिरासमोर गोविंदनगर कॉलनीत चार चोरट्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, सुरगस (ता. धडगाव) येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले कैलास प्रताप अलकारी व त्यांचे भाडेकरू विजय पडेरा पावरा हे दोन्ही बाहेरगावी असताना त्यांच्या दोघांच्या घरात मुख्य द्वारांचे कडीकोयंडे कटरने तोडून करून घरात प्रवेश केला व मुख्याध्यापक अलकारी यांच्या लाकडी कपाटांमध्ये ठेवलेले दीड लाख रुपये व १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या व दोन तोळे वजनाच्या गळ्यातील दोन चेन तसेच विजय पावरा यांच्या घरात त्यांच्या दुकानातील गल्ला असलेली २० हजार रुपयांची रोकड व आठ तोळ्यांचे चांदीच्या पायातले कडे चोरट्यांनी लंपास केले.

Kadikoyanda broken by the thieves and in the second picture the wooden cupboard was broken and the goods were messed up.
Nandurbar Crime News : चक्क स्त्रियांच्या वेशात धाडसी चोरी! 5 किलो चांदीची लूट; चोरीची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

कैलास अलकारी घरी आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकोयंडे कटरने तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करून तपासणी केली असता दोन्ही रूममधील कपाटातील सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शहादा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, असई प्रदीप राजपूत, पोलिस हवालदार संदीप लांडगे, घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, दिनकर चव्हाण, भरत उगले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरफोडीसंदर्भात शहादा पोलिस ठाण्यात कैलास अलकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

Kadikoyanda broken by the thieves and in the second picture the wooden cupboard was broken and the goods were messed up.
Nandurbar Crime News : पंजाबमधील गुन्हेगारांना हाडाखेडजवळ अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com