Nandurbar Crime : शहादा आगारातील वाहकाचा निर्घृण खून; नांदर्डे-तऱ्हावद रस्त्यावर फरशीपुलाखाली पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

Crime News : तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला शहादा बस आगारातील वाहकाचा शनिवारी (ता. १६) खून झाल्याची घटना रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली
Rajendra Marathe
Rajendra Maratheesakal
Updated on

शहादा : तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला शहादा बस आगारातील वाहकाचा शनिवारी (ता. १६) खून झाल्याची घटना रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील नांदर्डे-तऱ्हावद रस्त्यावर फरशीपुलाखाली घडलेल्या या घटनेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला असून, तोंडाचा भाग कुत्र्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर नेल्याने शेळ्या चारणाऱ्या मुलाच्या निदर्शनास आल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी शहादा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनापुढे घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Nandurbar Crime murder of driver in Shahada Agar marathi news)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा आगारातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३, रा. सदाशिवनगर, शहादा) गुरुवारी (ता. १४) दुपारी चारला त्यांच्या मोटारसायकलीने किराणा घेण्यास बाजारात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेही आढळून न आल्याने शहादा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कुठेही त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, शनिवारी (ता. १६) रात्री पावणेनऊच्या सुमारास नांदर्डे-तऱ्हावद रस्त्यावर फरशीपुलाखाली अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्याने त्यांना या बेपत्ता घटनेबाबत शंका आली.

त्यांनी तत्काळ बेपत्ता राजेंद्र मराठे यांच्या पत्नी मीनाक्षी, मुलगा प्रद्युम्न व मुलगी भावना यांना बोलावून घटनास्थळी नेले असता मृतदेहाचा अर्धवट जळालेला एक पाय, कपडे, पायाची नखे व तोंडाचा काही भाग दाखविला असता तो राजेंद्र मराठे यांचाच असल्याचे त्यांनी ओळखल्याने त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. (latest marathi news)

Rajendra Marathe
Waluj Crime News : डोक्यात गोळी घालून उद्योजकाचा खून;वाळूज औद्योगिक परिसरातील घटना

तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मराठे यांचा निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याने पोलिसदेखील चक्रावून गेले असून, त्यांचा परिवार या घटनेमुळे स्तब्ध झाला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरतात घटनास्थळी गर्दी झाली होती.

दरम्यान, घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या, तर उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे हेही घटनास्थळी थांबून होते. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्रीपासूनच घटनास्थळी घटनेचा उलगडा करण्यात व्यस्त होते.

त्यासाठी नंदुरबार येथून श्वानपथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. मृतदेहावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व कलसाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकांनी जागेवरच शिवविच्छेदन केले. भावना राजेंद्र सरोदे (मराठे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची सूत्रे पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी स्वतःकडे घेतली आहेत.

Rajendra Marathe
Nagpur Crime: पैसे मागितल्यावर वारंवार करायचा टाळाटाळ, उधारीच्या वादातून बापलेकाचा शेजाऱ्यावर हल्ला; तिघे जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com