Nandurbar Agriculture News : तळोद्यात 72 टक्के क्षेत्रावर पिकांची लागवड! पावसाने उघडीप दिल्याने पेरणीसह शेतीकामांना वेग

Nandurbar News : आजअखेरपर्यंत तालुक्यात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
Farm laborers planting soybeans in the field
Farm laborers planting soybeans in the fieldesakal

तळोदा : तळोदा शहरासह तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या विशेषतः कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका पेरणीला वेग दिला आहे. त्याचबरोबर परिसरात पिकांना रासायनिक खते देणे, औषधी फवारणी करणे, वखरणे आदी कामांची लगबगदेखील दिसून येत आहे. दरम्यान, आजअखेरपर्यंत तालुक्यात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. (Nandurbar Cultivation of crops on 72 percent of area)

तळोदा शहरासह तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या सुरवातीला जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. यादरम्यान पावसाची सतत रिपरिप सुरू होती. पावसामुळे शेतातील विशेषतः बागायती शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढले.

तसेच सततच्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पिकांना औषधी फवारणी करणे, खते देणे, पिकांची मशागत करणे आवश्यक होते. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांकडून ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून ज्वारी, सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्याचबरोबर कापूस, मकालागवडही करण्यात येत आहे. परिसरात सध्या काही शेतकऱ्यांडून बैलजोडीद्वारे, तर काही शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यात येत आहे. तसेच विविध शेतीच्या कामांनादेखील शेतकऱ्यांकडून वेग देण्यात आला आहे.

शेतीच्या कामांमुळे शहरासह तालुक्यातील शेतशिवार शेतमजुरांनी गजबजू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, पावसाने अजून चार-पाच दिवस उघडीप दिल्यास पेरण्या मोठ्या प्रमाणावर उरकवण्यात येतील, असे बोलले जात आहे.

कापूस, सोयाबीनला पसंती

आजअखेरपर्यंत तालुक्यात सुमारे १२ हजार ५१ हेक्टर म्हणजेच जवळपास ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यांपैकी सर्वांत जास्त आठ हजार ४५० हेक्टरवर कपाशीची, त्यानंतर एक हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच केळी ७६९ हेक्टर, पपई ३६६ हेक्टर, ऊस ८२१० हेक्टर, मिरची ४४५ हेक्टरवर लावण्यात आली आहे. मात्र तालुक्यात कधीकाळी मोठ्या प्रमाणात घेण्यात येणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, तीळ आदी पिकांची पेरणी नाहीच्या बरोबर आहे. (latest marathi news)

Farm laborers planting soybeans in the field
Dhule News : मर्चंट बँकेतील ठेवींचा 43 कोटींचा विमा मंजूर : विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई; टप्प्याटप्प्याने होणार वितरण

रोजगार उपलब्ध

दरम्यान, परिसरात जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात लागवड करण्यात आलेल्या कापूस तसेच केळी, ऊस, पपई यांसारख्या पिकांची निंदणी करणे, खते देणे, तणनाशक फवारणी ही कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यामुळे यानिमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

तळोदा बाजारपेठेत उत्साह

तळोदा शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, आता पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर शेती कामांना वेग दिला आहे. त्यामुळे शेतकरी विविध बियाणे, खते, फवारणी औषधे यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजारात गर्दी वाढली असून, उत्साह दिसून येत आहे.

९ जुलैपर्यंतची आकडेवारी (सर्व आकडेवारी हेक्टरमध्ये)

पीक लागवड/ टक्केवारी

तांदूळ ५७ २२.०१

ज्वारी ८९५ ४७.६८

मका ५४५ ३४.००

तूर २१० २१.२८

मूग ११ ०५.६१

सोयाबीन १,८७२ १०४.५८

कपाशी ८,४५० ८६.२४

Farm laborers planting soybeans in the field
Dhule News : सुरळीत विजेसाठी जीव खांबाले टांगला..! पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वायरमनांचा कर्तव्यदक्षपणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com