
नवापूर : शहरातून जाणाऱ्या सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. संततधारेमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
नव्याने तयार झालेला महामार्ग खड्डेमय झाला आहे. पुढे रस्ता तयार होतो, मागून खड्डे पडत आहेत. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे रस्ता खचतो, तर पावसाळ्यात पाण्यामुळे रस्ता उखडतो, याकडे प्रशासनाने व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देणे आवश्यक आहे. हा नागरिकांचा वेळ व जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार आहे, अशी तीव्र भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत. (Dhule Surat highway blocked Damage to vehicles)