Nandurbar Unseasonal Rain Damage : शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचल्या डॉ. हिना गावित

Nandurbar News : अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित शनिवारी (ता. १३) सकाळी तातडीने शहादा परिसरात पाहणी दौरा केला.
Unseasonal Rain Damage (file photo)
Unseasonal Rain Damage (file photo)esakal

Nandurbar News : अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित शनिवारी (ता. १३) सकाळी तातडीने शहादा तालुक्यातील हिंगणी, सारंगखेडा, वडाळी, बामखेडा, तोरखेडा, जयनगर व प्रकाशा परिसरात तातडीचा पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्तांच्या बांधावर जात दिलासा दिला. (Nandurbar Dr. Heena gavit reached damaged places in Shahada taluka)

शहादा तालुक्यातील हिंगणी, सारंगखेडा, वडाळी, बामखेडा, तोरखेडा, जयनगर व प्रकाशा यासह काही गावांना १२ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सारंगखेडा व परिसरात कलिंगड, खरबूज, डांगरमळे उद्ध्वस्त झाले. केळी, पपई, हरभरा, केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

ज्वारी काढणीला आली असतानाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी चांगलाच हादरला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन महिन्यात दुसऱ्यांदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचा प्रसंग घडला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाची दखल घेत खासदार डॉ. हिना गावित यांनी तातडीने नुकसानीची पाहणी केली. (latest marathi news)

Unseasonal Rain Damage (file photo)
Nandurbar News : E-KYC करूनही जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

उद्ध्वस्त झालेल्या केळीच्या बागा, पपईची झालेली नासधूस आणि इतर पिकांचे झालेले नुकसान मोठे आहे. या भागातील शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचे संकट झेलावे लागत आहे. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. याविषयी शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न निश्‍चितपणे केले जातील, असे आश्‍वासन डॉ. गावित यांनी दिले.

शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

अवकाळी पावसादरम्यान वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. फेस येथील आपल्या शेतात काम करीत असताना अनिल ओंकार पाटील वीज पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या घरी जाऊन वृद्ध आई-वडीलांची भेट घेतली. तसेच, धुळे येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी तब्येतीविषयी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर संपर्क करण्याच्या सूचना केल्या.

Unseasonal Rain Damage (file photo)
Nandurbar News : जिल्हाध्यक्षपदी राजेश जाधव, तर उपाध्यक्षपदी मनोज सोनार यांची निवड; नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com