Nandurbar Fake Seed Case : दर वर्षी अनधिकृत बियाण्याचा सुळसुळाट वाढतो कसा? प्रशासनानेच पावले उचलण्याची अपेक्षा

Crime News : खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच लाखोंचे अनधिकृत बियाणे ग्रामीण भागात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Fake Seed Case
Fake Seed Caseesakal

शहादा : अनधिकृत बियाणे विक्री प्रकरणी गेल्या वर्षी कृषी विभागाच्या पथकाने छापे टाकून लाखोचा साठा जप्त केला होता, संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले. तरीही पुन्हा यंदा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे बिनदिक्कतपणे खरीप हंगाम सुरू व्हायच्या आधीच अनधिकृत बियाणे जिल्ह्यात दाखल झाले आहे. हेच खापर (ता. अक्कलकुवा) येथे गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रदिनी एका वाहनावर कारवाई करत ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. (Nandurbar fake seed scam grow every year)

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच लाखोंचे अनधिकृत बियाणे ग्रामीण भागात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच कारवाई असली तरी कृषी विभागाने यात सातत्य राखत बोगस बियाणे विक्रेत्यांची पाळेमुळे खणून काढत कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

बोगस बियाणे, खते यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी सात पथके सध्या कार्यान्वित झाली आहेत. पथकामार्फत विविध आस्थापनांची चौकशी होत असली तरी बोगस बियाणे विक्रेते संबंधित बियाणे आस्थापनांवर न ठेवता इतरत्र ठेवतात.

जिल्ह्यात सध्या बऱ्याच अवैध व्यवसायांना लगाम लागला आहे; परंतु परराज्यातून एवढा मोठा बियाण्यांचा साठा दर वर्षी तालुक्यात येतोच कसा? यात नेमका आशीर्वाद कोणाचा, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दर वर्षी कृषी विभाग माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून मुद्देमाल जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून सोपस्कार तर पार पाडतातच; परंतु अनधिकृत बियाणे विक्रेत्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेऊन पाळेमुळे खणण्याची गरज आहे; अन्यथा शेतकरी अनधिकृत विक्रेत्यांच्या आमिषाने पुरता देशोधडीला लागेल.

कारवाईचे स्वागत, परंतु सातत्य आवश्यक

कृषी विभागाच्या पथकाने महाराष्ट्रदिनी खापर (ता. अक्कलकुवा) येथे गुजरातमार्गे जिल्ह्यात येणारे बियाणे सीमेवर अडवून जप्त केले. संबंधितावर गुन्हाही दाखल झाला. यंदाच्या खरीप हंगामाची ही पहिलीच कारवाई आहे.

या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असले तरी जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे असल्याची चर्चा आहे. त्याचा शोध पथकाने घ्यावा व कारवाई करून अनधिकृत बियाणे लागवडीपासून सर्वसाधारण शेतकऱ्यांना वाचवावे, अशी मागणी प्रगतिशील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. (latest marathi news)

Fake Seed Case
Chandrapur Crime : चोरट्यांनी फोडले न्यायाधीशांचे घर;सोने, चांदीचे दागिने, रोख रकम केली लंपास

शहादा तालुक्यात सर्वाधिक विक्रीचा अंदाज

दरम्यान, तालुक्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे विक्री होते हे आजपर्यंत कृषी विभागाने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. शेतकऱ्यांना हे बियाणे घेण्याचे आमिष कथित अनधिकृत विक्रेत्यांकडून केले जाते. शेतकरी या आमिषाला बळी पडून लागवड करतात. कृषी विभागाने निदान

गावोगावी या बियाण्यांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे; अन्यथा अनधिकृत बियाणे लागवड करून शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी झळ सोसावी लागेल. आधीच लॉकडाउन तसेच तत्सम बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

तक्रार करा, कारवाई करू

अनधिकृत बियाणे कोणी विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाला माहिती द्यावी. अनधिकृत बियाणे कोणी खरेदी करू नये, असे वारंवार कृषी विभागाकडून आवाहन केले जाते; परंतु प्रत्येक गावाला कृषी सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सहाजिकच त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याशी व दुकानदारांशी त्यांची जवळीक निर्माण होते. शेतकऱ्यांकडून गोपनीय माहिती त्यांना सहज मिळू शकते. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास अनधिकृत बियाण्याची पाळेमुळे सहज खणली जाऊ शकतात.0

Fake Seed Case
Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आईचा आरोप , कथित बाबा आश्रमातून पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com