Nandurbar Drought News : पाण्याची पातळी खोल; बोअरवेल्स कोरडेठाक

Nandurbar News : पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेल्याने शेकडो बोअर कोरडे पडत आहेत. त्यासाठी पुन्हा नवीन बोअरवेल्स करण्यास शेतकरी प्राधान्य देत असून, त्यातही अनेक बोअरवेल्स कोरडेठाक जात आहेत.
As there is no water at the base of the Satpura, a cloud of dust flies when the boring is going on.
As there is no water at the base of the Satpura, a cloud of dust flies when the boring is going on.esakal

शहादा : गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस व दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान बघता शहादा तालुक्यात पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेल्याने शेकडो बोअर कोरडे पडत आहेत. त्यासाठी पुन्हा नवीन बोअरवेल्स करण्यास शेतकरी प्राधान्य देत असून, त्यातही अनेक बोअरवेल्स कोरडेठाक जात आहेत. (Nandurbar Hundreds of bores are drying up as water table goes deep into ground)

त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, नागरिकांनादेखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बोअर कोरडे पडत असल्याने बागायती पिके धोक्यात आलेली आहेत. त्यात प्रामुख्याने केळी, पपई तसेच उसाला सातत्याने पाणी लागते. जे बोअर सुरू आहेत त्यांना पुरेसा पाण्याच्या साठा नसल्याने शेतकऱ्यांना दर दोन ते तीन तासांत वीजपंप सुरू करावे लागतात.

दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत असल्याने मे महिन्यात कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. बोअर करून फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून डोक्याला हात लावला जात आहे. शहादा शहरासह परिसरात असंख्य बोअरच्या गाड्या बोअर करताना दिसत आहेत.

त्यात सर्वाधिक गाड्या राजस्थानमधील आहेत. काही ठिकाणी जमिनीत पाणी लागते, तर काही ठिकाणी अक्षरशः बोअर करताना केवळ धुळीचा धुरळा बाहेर पडतो. बोअरिंगला पाणी लागले नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आजच्या परिस्थितीमध्ये ५०० फुटांपेक्षा जास्त, तर हजार फुटांपर्यंत खोलवर बोअर केले जात आहेत. शहादा शहरातदेखील नवीन वसाहतींमध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. (Latest Marathi News)

As there is no water at the base of the Satpura, a cloud of dust flies when the boring is going on.
Nandurbar Summer Heat : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी; उन्हाचा तीव्रेतेत वाढ, उकाडाने नागरिक हैराण

धरणांनी गाठला तळ

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहादा शहरासह परिसरातील नद्या-नाल्यांना मोठे पूर आले नाहीत. साठवण बंधारे, पाझर तलावासह तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्प अर्थात धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्याने जमिनीत पाण्याची पातळी कमी झालेली आहे. शहादा तालुक्यातील सुसरी, राणीपूर, चिरखाण, दुधखेडा, लोंढरे.

कोंडावळ या धरणांमध्ये साठा शिल्लक राहिला नसून तळ गाठला आहे. गोमाई, सुसरी, वाकी, कणेरी या नद्यांना पावसाळ्यात मोठे पूर आले नव्हते. शहादा तालुक्यात जल फाउंडेशनमार्फत जी कामे करण्यात आली, साठवण बंधारे बांधण्यात आले त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा साठा नाही. सर्व साठवण बंधारे व पाझर तलाव कोरडे आहेत.

As there is no water at the base of the Satpura, a cloud of dust flies when the boring is going on.
Nandurbar Drought News : सातपुड्याच्या दुर्गम भागात दुष्काळाचे सावट

"शहादा तालुक्यात जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअर कोरडे पडत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जेवढे पाणी उपलब्ध आहे ते पुरविण्यासाठी ठिबक सिंचन योजनेवर भर दिला जात आहे. नद्या-नाल्यांचे पाणी अडविणे गरजेचे आहे. बागायती पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस हे मुख्य कारण आहे. पावसाळ्यात पाणी अडविले गेलेच पाहिजे." -राकेश पाटील, शेतकरी, बामखेडा (ता. शहादा)

"गेल्या पंचवीस वर्षांपासून मी बोअरिंगचा व्यवसाय करीत आहे. सध्याची परिस्थिती बिकट झाली आहे. पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेल्याने अनेक बोअर कोरडे निघत आहेत. अक्षरशः धूळ बाहेर येते. एक हजार फुटांपर्यंतदेखील खोलवर आम्ही बोअर करीत आहोत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले सहकार्य करण्याच्या आमचा प्रयत्न राहील. ज्या ठिकाणी जमिनीत पाणी लागणार नाही अशी शंका आल्यास आम्ही बोअरिंग करणे थांबवत असतो. गेल्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे." -भरतसिंग गिरासे, बोअरिंग व्यावसायिक, काथर्दे (ता. शहादा)

As there is no water at the base of the Satpura, a cloud of dust flies when the boring is going on.
Nandurbar Lok Sabha Constituency : लढाई मुलांची, पण लढताहेत पालकच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com