.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nandurbar Ganesh Utsav : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या गणरायाचे आज (ता. ७) उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळांसह अनेक घरगुती गणेश मूर्तींची मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत गणेशमूर्ती मंडळाच्या ठिकाणी नेण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत आठशेवर मूर्ती स्थापनेची नोंद झाली असली तरी खासगी गणपतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. (Installation of Ganesha idols at Hazara with public and private circles )