Nandurbar News : जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत; आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश

Nandurbar News : आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
uday Samant & Rajesh Padavi
uday Samant & Rajesh Padaviesakal

तळोदा : पावसाळी अधिवेशनात शहादा-तळोदा मतदारसंघातील तसेच शेजारील धडगाव तालुक्यातील नागरिकांच्या स्थलांतराच्या महत्त्वाच्या मुद्द्याला आमदार राजेश पाडवी यांनी वाचा फोडली होती, तसेच स्थलांतराचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघात एमआयडीसी किंवा मिनी एमआयडीसी उभारण्याची मागणी केली. आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. (Nandurbar Investment of two thousand crores in district)

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, गुरुवारी (ता. ४) अधिवेशनात शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघासाठी तसेच सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वापूर्ण असलेल्या स्थलांतराच्या मुद्द्यावर लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे.

रोजगाराच्या अभावामुळे शहादा-तळोदा मतदारसंघातील तसेच शेजारील धडगाव तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे दर वर्षी परराज्यात रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करीत असतात आणि परिणामी आदिवासी समाजातील नागरिकांचे शिक्षणाकडे व आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची बाब त्यांनी या वेळी बोलताना अधोरेखित केली.

तसेच स्थलांतर करणाऱ्यांमध्ये महिलांचादेखील मोठा समावेश असल्याने हा प्रश्न गंभीर असून, स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. तसेच स्थलांतर रोखण्यासाठी मतदारसंघात एमआयडीसी किंवा मिनी एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारे नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार पाडवी गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी हिवाळी अधिवेशनातदेखील लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यानदेखील हा महत्त्वाचा मुद्दा आमदार पाडवी यांनी उचलून धरला.

एमआयडीसी उभारण्याकरिता पुरेशी साधनसामग्री, मनुष्यबळ तसेच शासनाची जागादेखील उपलब्ध आहे हेसुद्धा शासनाच्या लक्षात आणून दिले आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे आश्वासन दिले असून, यांपैकी पाचशे कोटींची गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अधिवेशनात दिली. (latest marathi news)

uday Samant & Rajesh Padavi
Nandurbar News: घरकुल हवंय..! तर ग्रामपंचायतीकडे करा अर्ज; निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची ग्रामसभेत होणार निवड

स्थलांतर थांबणार?

सातपुड्याच्या दुर्गम भागातील शहादा, तळोदा तसेच धडगाव तालुक्यातील असंख्य नागरिक दर वर्षी रोजगारासाठी परराज्यात हंगामी स्थलांतर करतात. उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करण्याचे आणि त्यातून रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन दिल्याने आश्वासन लवकर पूर्ण झाल्यावर नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यास मदत होईल, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

गुजरातचे टेक्स्टाईल उद्योग येणार

उद्योगमंत्री सामंत यांनी अधिवेशनात मंगळवारी माहिती देताना नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यासाठी सुरत व गुजरातमधील इतर शहरांमधील टेक्स्टाईलचे उद्योग येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, मंत्र्यांनी दिलेले आश्वासन लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

uday Samant & Rajesh Padavi
Inspirational News : बाळाचे संगोपन करून जिद्दीने ‘फिटनेस’चा सराव! खाकी वर्दीसाठी घाम गाळणाऱ्या युवती ठरतायेत प्रेरणास्रोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com