Nandurbar Lok Sabha Constituency : कॉंग्रेस -भाजपमध्येच 45 वर्षापासून रंगतेय सरळ लढत

Nandurbar News : १९८० च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरूपसिंग हिऱ्या नाईक हे उमेदवार अपवाद वगळता माणिकराव गावित सलग नऊ वेळेस कॉंग्रेसचे यशस्वी उमेदवार ठरले आहेत.
Nandurbar Lok Sabha Constituency 
bjp vs congress
Nandurbar Lok Sabha Constituency bjp vs congressesakal

Nandurbar News : ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणत ४५ वर्षापासून कॉंग्रेस -भाजपमध्येच सरळ लढत रंगतांना दिसत आहे. मध्यतंरी जनता दलाच्या उमेदवारांची हॅट्रीक वगळता कॉंग्रेस व भाजप उमेदवारांमध्येच चुरशीच्या लढती झाल्या आहेत. एवढेच नव्हे; तर अनेक वर्षानुवर्षे उमेदवारही तेच ,फक्त निवडणुकीचे वर्ष बदलत गेल्याचे चित्र नंदुरबार लोकसभा मतदार संघात दिसून येते. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरूपसिंग हिऱ्या नाईक हे उमेदवार अपवाद वगळता माणिकराव गावित सलग नऊ वेळेस कॉंग्रेसचे यशस्वी उमेदवार ठरले आहेत. (Nandurbar Lok Sabha Constituency)

तर भाजप व जनता दलाच्या उमेदवारांना पराभूत केले आहे. या पक्षांचे उमेदवार बदलत गेले. त्यानंतर मात्र कॉंग्रेससह जनता दल व भाजपचेही उमेदवार तेच केवळ निवडणुकीचे वर्ष बदलत गेल्याचे मागील आढावा घेतल्यास दिसून येते.१९८० ला कॉंग्रेसतर्फे सुरूपसिंग नाईक तर जनता दलातर्फे कुंवरसिंग फुलजी नाईक हे प्रमुख उमेदवार होते.

त्यात श्री. नाईक विजयी ठरले होते. त्यानंतर श्री. नाईक यांनी राज्याचा राजकारणात राहण्याचे निश्‍चित केल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र माणिकराव होडल्या गावित यांना १९८४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरविले. तेव्हापासून तर थेट २०१४ पर्यंत माणिकराव गावित हे कॉंग्रेसचे ठरलेले व विजयी घौडदौड असलेले टॉप टेन उमेदवार ठरले. १९८४ ला श्री. गावित यांच्यासमोर जनता पक्षाकडून झिन्या श्‍याम्या वसावे उमेदवार होते.

इतर तीन असे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यात श्री. गावित यांचा विजय झाला होता. तसेच १९८९ मध्ये माणिकराव गावित यांच्यासमोर जनता दलाचे ॲड. के. सी. पाडवी व भाजपचे कुंवरसिंग वळवी रिंगणात होते. तेव्हाही माणिकराव गावित २ लाख ४० हजार ९२५ मतांनी निवडून आले होते. तर पाडवी यांना १ लाख ३४ हजार ४५९ मते मिळाली होती.

वळवी यांना ७६ हजार ८९० मते मिळाली होती. तसेच १९९१ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे गावित यांच्यासमोर जनता दलाकडून पुन्हा के. सी.पाडवी तर भाजपतर्फे वाण्याविहीर येथील दिलवरसिंग पाडवी उभे ठाकले होते. त्यात दिलवरसिंग पाडवी हे दुसऱ्या क्रमांकावर तर के. सी.पाडवी तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. त्यावेळी सहा उमेदवार रिंगणात होते. खरी लढत तेव्हा कॉंग्रेस विरूध्द भाजप अशी ठरली. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Constituency 
bjp vs congress
Nanded Loksabha Constituency : मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारी भाजपची, फडणवीस ; नांदेडला प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला अर्ज

तर १९९६ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे माणिकराव गावित यांच्यासमोर समाजवादी पार्टीतर्फे राजेंद्र धेड्या गावित, भारतीय इंदिरा कॉंग्रेसतर्फे गोविंद रामू वसावे, भाजपचे कुंवरसिंग वळवी यांच्यासह अपक्ष असे ९ उमेदवार रिंगणात होते. या साऱ्यांचा धुव्वा उडवित कॉंग्रेसचे गावित २ लाख ३६ हजार ६०८ मतांनी विजयी ठरले होते.

त्यानंतर दोन वर्षांनी लोकसभा बरखास्त झाल्याने पुन्हा १९९८ च्या निवडणुकीत कॉंग्रसचे माणिकराव गावित, भाजपचे कुवरसिंग वळवी,अखिल भारतीय सेनेतर्फे ॲड. पद्माकर वळवी व इतर दोन अपक्ष असे पाच जण रिंगणात होते. तेव्हाही माणिकराव गावित विजयी झाले. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकार आले.

मात्र ते १३ महिने टिकले. त्यानंतर पुन्हा १९९९ मध्ये निवडणुक झाली. त्यातही कॉंग्रेसचे माणिकराव गावित, भाजपचे कुंवरसिंग वळवी, सीपीएमच्या भुरीबाई शेमळे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गोविंद रामू वसावे उमेदवार होते. त्याही वेळेस माणिकराव गावित चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत पुन्हा माणिकराव गावितांसमोर भाजपचे कुंवरसिंग वळवी यांच्या ऐवजी डॉ. सुहास नटावदकर यांना उमेदवारी दिली.

तरीही माणिकराव गावित यांनाच मतदारांनी कल दिला. २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे गावितच उमेदवार तर भाजपचेही डॉ. सुहास नटावदकर हेच उमेदवार आणि इतर पाच असे सात उमेदवार रिंगणात होते. तेव्हाही दुसऱ्यांदा डॉ. नटावदकर यांना श्री.गावित यांनी पराभूत केले. मात्र २०१४ ची लोकसभा निवडणुक परिवर्तनाचा इतिहास घडविणारी ठरली.

Nandurbar Lok Sabha Constituency 
bjp vs congress
Loksabha Election 2024 : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

या निवडणुकीत कॉंग्रेसचे टॉप टेन खासदार ठरलेले माणिकराव गावित यांच्यासमोर उच्च शिक्षित, युवा व राजकिय वारसा असलेले उमेदवार म्हणून डॉ. हिना गावित यांना भाजप प्रवेश करून घेत लोकसभेची उमेदवारी दिली. मोदी लाट, परिवर्तनाची लाट आणि डॉ.हिना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्री म्हणून केलेले जिल्ह्यातील विकास कामे.

स्वतः डॉ. हिना गावित यांनी वैद्यकिय शिक्षण घेत असतांना भरविलेले आरोग्य शिबीरे व त्यातून गोरगरिबांना दिलेली आरोग्य सेवा या साऱ्यांच गोष्टींचा संगम जुळून आला. त्यामुळे माणिकराव गावित यांना ही निवडणूक धक्का देणारी ठरली.

नऊ वेळेस निवडून आलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित यांचा पराभव करीत भाजपने मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ३० वर्षानंतर का होईना एन्ट्री मिळविली. तेव्हापासून पुन्हा यंदाची तिसरी निवडणुकीत भाजपच्या डॉ. हिना गावित याच उमेदवार राहिल्या.

तर कॉंग्रेसतर्फे त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे के.सी.पाडवी व यंदा त्यांचे पुत्र गोवाल पाडवी उमेदवार आहेत. अशी कॉंग्रेस-भाजपमधील निवडणुकीची चुरशीची लढत ४५ वर्षानंतरही आजही कायम राहिली आहे. उमेदवारही तेच अनेकदा रिपीट झाले आहेत.

Nandurbar Lok Sabha Constituency 
bjp vs congress
Loksabha Election 2024 : राजकीय पक्षांचा मोर्चा नवमतदारांकडे ;ओडिशात विद्यार्थी संघटना सक्रिय,विविध उपक्रमांचे आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com