Nandurbar Lok Sabha Constituency : गावित कुटुंबाविषयी नाराजी भोवली, भाजपसाठीही आत्मचिंतन

Lok Sabha Constituency : गावित कुटुंबाविषयी नाराजीतून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली, असे चित्र निर्माण झाले होते.
Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituencyesakal

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हीना गावित यांचा पराभव म्हणजे विश्‍वास न बसण्यासारखी बाब असली, तरी कुटुंबातच असलेली महत्त्वाच्या राजकीय पदांची महत्त्वाकांक्षा, स्वपक्षासह मित्रपक्षांमधील नेत्यांची नाराजी त्यांना भोवली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गावित कुटुंबाविषयी नाराजीतून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली, असे चित्र निर्माण झाले होते. ( Displeasure with Gavit family introspection for BJP )

नंदुरबार लोकसभेतील जनतेने ॲड. गोवाल पाडवी यांच्या रूपाने नवीन व कोरी पाटी असलेल्या चेहऱ्याला संधी दिली आहे. हा पराभव केवळ गावित कुटुंबालाच नव्हे, तर पक्षाचा नेत्यांनाही चिंतन करायला लावणारा आहे. नंदुरबार जिल्हा आणि गावित कुटुंब यांचे एक वेगळे समीकरण जुळले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावित या उच्चशिक्षित युवकाने १९९५ मध्ये प्रस्थापितांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून ती जिंकली आणि राजकारणाचा श्रीगणेशा केला.

तेव्हापासून आजपर्यंत मधल्या पाच- सात वर्षांचा अपवाद वगळता त्यांना सतत मंत्रिपद मिळाले. मिळालेल्या संधीचे सोने करून या जिल्ह्याच्या व जनतेच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले, ते नाकारता येणार नाही. त्यातूनच राजकीय संघर्षाला सुरवात झाली. त्यानंतर २०१४ मध्ये डॉ. गावित यांनी कन्या डॉ. हीना गावित यांना भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली. मोदी लाटेमुळे डॉ. हीना यांनी टॉप टेन खासदार (कै.) माणिकराव गावित यांचा पराभव करीत दिल्ली सर केली.

त्यांनी पाच वर्षांत चांगले काम केले. अभ्यासू वृत्ती, उच्चशिक्षित, काहीतरी करण्याची तळमळ पाहून त्यांना २०१९ मध्येही दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली. त्यांनी काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी यांचा ९५ हजार ५०० मतांनी पराभव करून विजय मिळविला. गेल्या दहा वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाचा व पर्यायाने जनतेचा विकास करण्याचा केलेला प्रयत्न नाकारता येणार नाही. मात्र, ते करीत असताना मित्रपक्षाला डावलल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चालणार कोणाची जादू ?

त्यांच्याबरोबर राज्यातील मंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावित हेही मित्रपक्षाचे नेते- कार्यकर्ते यांचे कामे करीत नसल्याचा आरोप झाला. त्यातच जिल्हा परिषदेत फोडाफोडीचे राजकारण करीत दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित यांना अध्यक्षपदी बसविले. यातून स्वपक्षासह मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली. त्यातच जवळच असलेले काही विश्‍वासातले पदाधिकारी- कार्यकर्त्यांना एकमेकांच्या सांगण्यावरून डावलण्यात आले.

त्यामुळे तिसऱ्यांदा डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीला स्वपक्षासह मित्रपक्षांनी विरोध केला होता. म्हणून उलट त्यांच्याकडे विरोधक म्हणूनच पाहिले गेले. मात्र, त्यांच्याशी वेळीच संपर्क करून नाराजी दूर कऱण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यातून राजकीय विरोधक वाढले. संघर्ष वाढला. विरोधात गेलेल्यांनी काँग्रेसला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष साथ दिली. त्यातून आजच्या निकालात विकासाला साथ न देता जनतेने गावित कुटुंबाविषयी नाराजीमुळे नवख्या व कोरी पाटी असलेल्या ॲड. गोवाल पाडवी यांना बळ दिले.

सामाजिक मुद्यावर प्रचार प्रभावी

मोदी सरकार आरक्षण काढून घेणार, हा मुद्दा आदिवासी-बहुजन समाजाला खटकणारा ठरला. मणिपूर घटनेविषयी संसदेत एकदाही डॉ. हीना गावित यांनी आवाज उठविला नसल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला. डिलिस्टींग असो की मग घरातच सत्तेच्या केंद्राच्या लोभामुळे जवळचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावले. मतदार जागरूक झाला. विरोधकांनी प्रचाराचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यामुळे डॉ. हीना यांनी केलेल्या विकासापेक्षा आरक्षण, मणिपूर, डिलिस्टींग हे मुद्दे जनतेच्या भावनेला हात घालणारे ठरले.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituency : निकालाचे काऊंट डाऊन सुरू! भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली धकधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com