Nandurbar Lok Sabha Election : 9 हजार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार करणार घरबसल्या मतदान!

Nandurbar News : उन्हाळ्याची सुरवात होताच विहिरी-कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिके वाचविणे जिकिरीचे झाले आहे.
Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Electionesakal

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील नऊ हजार ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाची सेव पुरविण्यात येणार आहे. तसे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी नऊ हजार मतदारांनी घरूनच मतदान करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे विनंती पत्र प्रशासनाला भरून देत नोंदणी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. (Nandurbar Lok Sabha Election 9 thousand senior citizens disabled voters will vote at home)

या मतदानासाठीची मतदारयादीचे काम पूर्ण झाले असून ती प्रसिध्दही झाली आहे. मात्र निवडणूक आयोगाने या वर्षी ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी त्यांच्या इच्छेनुसार घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्हा निवडणूक अधिकारी मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे व निवासी जिल्हाधिकारी हरीष भामरे यांच्या नियोजनाखाली जिल्ह्यातील ८० वर्षावरील मतदारांची व दिव्यांग मतदारांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात २९ हजार ३७३ मतदार ८५ वर्षावरील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर त्यांची घरपोच जाऊन भेट घेऊन पथकाद्वारे त्यांचा वयाचा अथवा दिव्यांगत्वाचा दाखला खात्री करून ऐच्छिक धोरणानुसार त्यांना मतदानासाठी घरपोच सेवा पुरविण्याचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यात नंदुरबार जिल्ह्यात नऊ हजार ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी तसे अर्ज निवडणुक विभागाकडे भरून दिले आहेत. (latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha: वडिलांनंतर मुलगा आजमावतोय आता लोकसभा उमेदवारीतून नशीब! डॉ. गावित व ॲड. पाडवींना राजकीय ‘श्रीगणेशा’ची संधी

त्यांना घरपोच बॅलेट पेपर व मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी मतदान करतांना आडोसाची सुविधा, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक असे पथक तयार कऱण्यात येणार आहे. हे पथक अत्यंक कडक नियमाने मतदान करून घेणार आहेत. सर्व प्रक्रिया नियमित मतदानाप्रमाणे पार पडणार आहे.

अशी आहे मतदारसंघनिहाय ज्येष्ठ (८५ प्लस) मतदारांची संख्या :

अक्कलकुवा - ४,९४९

शहादा- ८,२१०

नंदुरबार - १०,१३८

नवापूर - ६,०७६

-----------------

एकूण-२९,३७३

Nandurbar Lok Sabha Election
Nandurbar News : ‘त्या’ व्हायरल छायाचित्राने घडविले ‘एकी’चे दर्शन; डॉ. गावित- पाडवी यांच्या गुप्त भेटीने चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com